India vs Scotland: स्कॉटलँड विरुद्ध सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्डेडिअमवर (Dubai International Stadium) हा सामना खेळला जाणार आहे. भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहली (Virat Kohli) करणार आहे. तर, स्कॉटलँडच्या कर्णधार पदाची जबाबदारी काइल कोएत्झरच्या  (Kyle Coetzer) खांद्यावर सोपण्यात आली आहे. भारतासाठी आजचा सामना अतिशय महत्वाचा आहे. भारतीय संघाने आजचा सामना गमवला तर, त्यांना उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडावं लागणार. भारत स्कॉटलँडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या चौथ्या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल.


भारताची टी-20 विश्वचषकात अतिशय खराब सुरुवात झाली. भारतीय संघाला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात पराभव स्वाकारावा लागला. भारताने गुरुवारी अफगाणिस्तानला पराभूत करून पहिल्या विजयाची नोंद केली. या सामन्यात रोहित शर्मा आणि केएल राहुल विजयाचे शिल्पकार ठरले. भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानसमोर 20 षटकात 2 विकेट्स गमावून 211 धावांचे विशाल आव्हान ठेवले. हे आव्हान अफगाणिस्तानच्या संघाला यशस्वीरीत्या पेलवता आले नाही. 


अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात भारताने चांगली कामगिरी बजावून दाखवली होती. भारताकडून आजच्या सामन्यातही अशीच कामगिरी पाहायला मिळेल, अशी अपेक्षा केली जाते. भारत या सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन स्कॉटलँडच्या संघाला कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करेल. तसेच भारताला हा सामना कमी षटकात जिंकून संघाच्या  रनरेटमध्ये सुधारणा करता येऊ शकते. 


संघ-


भारतीय संघ-
केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह


स्कॉटलँडचा संघ- 
जॉर्ज मुन्से, काइल कोएत्झर (कर्णधार), मॅथ्यू क्रॉस (विकेटकिपर), रिची बेरिंग्टन, कॅलम मॅकलिओड, मायकेल लीस्क, ख्रिस ग्रीव्हज, मार्क वॉट, अलास्डेअर इव्हान्स, सफियान शरीफ, ब्रॅडली व्हील


संबंधित बातम्या-