IND Vs SCO T20 World Cup 2021 Live Updates: भारताचा स्कॉटलंडवर आठ विकेट्नी विजय
IND Vs SCO: भारताची टी-20 विश्वचषकात अतिशय खराब सुरुवात झाली. भारतीय संघाला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात पराभव स्वाकारावा लागला. भारताने गुरुवारी अफगाणिस्तानला पराभूत करून पहिल्या विजयाची नोंद केली.
भारताने स्कॉटलंडवर आठ विकेट्सनी विजय मिळवला आहे. भारताने 86 धावांचे आव्हान 6.3 षटकात पूर्ण केलं.
स्कॉटलँडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करून दिलीय. भारताचा स्कोर- 27/0 (2.1)
या स्पर्धेत चांगले प्रदर्शन करून क्रिकेटरसिकांना प्रभावित करणाऱ्या स्कॉटलँडच्या फलंदाजांनी भारतासमोर आज गुडघे टेकले. प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलँडच्या संघाला 20 षटकात 10 विकेट्स गमावून 84 धावापर्यंत मजल मारता आली.
भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्यासाठी स्कॉटलँडच्या संघाला पाचवा झटका लागला आहे. तर, या सामन्यात जाडेजाने त्याची तिसरी विकेट्स पटकावली आहे. स्कॉटलँडचा स्कोर- 58/5 (11.2)
स्कॉटलँडच्या संघाला चौथा झटका लागला असून या सामन्यात भारतीय गोलंदाजांची जादू पाहायला मिळत आहे. स्कॉटलँडचा स्कोर- 2
स्कॉटलँडविरुद्ध सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदीचा निर्णय घेतला आहे. भारताने घेतलेला निर्णय योग्य ठरत असून जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर स्कॉटलॅंडने त्यांचा पहिला विकेट्स गमावला आहे. कर्णधार काइल कोएत्झर आऊट 1 धाव करून माघारी परतला आहे. स्कॉटलँडचा स्कोर-13/1 (3)
स्कॉटलंडविरुद्ध आज होणाऱ्या सामन्यामध्ये भारताने टॉस जिंकला असून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
पार्श्वभूमी
भारत आणि स्कॉटलंड संघ आज आमने-सामने येणार आहेत. भारत आणि स्कॉटलंड यांच्यातील सामना संध्याकाळी 07.30 वाजता सुरू होईल. त्याचवेळी नाणेफेकीसाठी दोन्ही संघांचे कर्णधार सामना सुरु होण्याच्या अर्धा तास आधी मैदानात उतरतील. या स्पर्धेत भारताने अद्याप एकदाही नाणेफेक जिंकले नाही. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
संघ-
भारत:
विराट कोहली (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, राहुल चहर, इशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती आणि सूर्यकुमार यादव.
स्कॉटलँड:
काइल कोएत्झर (कर्णधार), रिची बेरिंग्टन, डायलन बझ, मॅथ्यू क्रॉस (विकेटकिपर), जोश डेव्ही, अलास्डायर इव्हान्स, ख्रिस ग्रीव्हज, हमजा ताहिर, मायकेल लीस्क, कॅलम मॅकलिओड, जॉर्ज मुंसी, सफियान शरीफ, क्रेग वॉलेस , विकेटकीपर), मार्क वॅट, ब्रॅडली व्हील आणि ऑली हेयर्स.
भारताची टी-20 विश्वचषकात अतिशय खराब सुरुवात झाली. भारतीय संघाला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात पराभव स्वाकारावा लागला. भारताने गुरुवारी अफगाणिस्तानला पराभूत करून पहिल्या विजयाची नोंद केली. या सामन्यात रोहित शर्मा आणि केएल राहुल विजयाचे शिल्पकार ठरले. भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानसमोर 20 षटकात 2 विकेट्स गमावून 211 धावांचे विशाल आव्हान ठेवले हे आव्हान अफगाणिस्तानच्या संघाला यशस्वीरीत्या पेलवता आले नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -