A Young Girl Emulates Jasprit Bumrah's Bowling Style : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला जगातील प्रत्येक फलंदाज घाबरतो. बुमराहची आगळीवेगळी गोलंदाजीही जगभरात प्रसिद्ध आहे. त्याचा तुफानी यॉर्करवर फलंदाज थेट पाणी मागताना दिसतात. अनेक गोलंदाज बुमराहच्या गोलंदाजीची नक्कल करण्याचा प्रयत्न करतात. 


अलीकडेच काही खेळाडू त्याच्यासारखी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करताना दिसले. परंतु बुमराहसारखी गोलंदाजी करताना तुम्ही याआधी कधीही मुलगी पाहिली नसेल. खंरतर, सध्या एका शाळकरी मुलीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती बुमराहसारखी गोलंदाजी करताना दिसत आहे.


इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक शाळकरी मुलगी नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसत आहे. शाळेच्या गणवेशात चष्मा घातलेली ही विद्यार्थी बुमराहप्रमाणेच धावते आणि त्याच प्रकारे चेंडू टाकते. हा व्हिडिओ अनेक युजर्सनी शेअर केला आहे.






चाहत्यांची बीसीसीआयकडे मागणी


व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक वापरकर्त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) ग्रूमिंगची मागणी करण्यास सुरुवात केली. अशा प्रतिभेला विकासाची संधी दिली तर ते एक दिवस भारतासाठी मोठे काम करू शकतात, असे चाहत्यांचे म्हणणे आहे.


बुमराहची टी-20 वर्ल्ड कपमधील कामगिरी


नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये जसप्रीत बुमराहने आपल्या शानदार कामगिरीने प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना थक्क केले होते. बुमराहने टीम इंडियासाठी 8 डावात 15 विकेट घेतल्या. तो अर्शदीप सिंगनंतर सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरला.


बुमराहला श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. पुढील महिन्यात होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून त्याचे पुनरागमन अपेक्षित आहे, मात्र या मालिकेतूनही त्याला विश्रांती दिली जाऊ शकते, असे बोलले जात आहे. बुमराह न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत पुनरागमन करू शकतो.


संबंधित बातमी :


Pat Cummins : पॅट कमिन्सचा मोठा निर्णय! क्रिकेटमधून अचनाक घेतला ब्रेक; जाणून घ्या कारण    


मोठी घोषणा! कसोटी क्रिकेटचं 150 वर्ष धुमधडाक्यात साजरं होणार; 'या' दोन संघांमध्ये होणार सामना   


WTC फायनलमध्ये जाण्यासाठी टीम इंडियाला खेळावा लागणार मोठा गेम; जाणून घ्या काय आहे नेमकं गणित