Ishan Kishan Performance in Buchi Babu Tournament Match : टीम इंडियातून बाहेर असलेला यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनने बांगलादेश मालिकेपूर्वी आपला दावा पक्का केला आहे. बुची बाबू ट्रॉफीमध्ये झारखंड संघाचा कर्णधार असलेल्या इशान किशनने मध्य प्रदेशविरुद्ध दोन गडी राखून संघाला विजय मिळवून दिला. इशान किशनने पहिल्या डावात शानदार शतक झळकावले होते. त्याने 114 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात त्याने 41 धावांची नाबाद खेळी केली. चौथ्या डावात झारखंडला विजयासाठी 138 धावा करायच्या होत्या. शेवटी इशान किशनने दोन षटकार लगावत संघाला विजय मिळवून दिला.
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक खेळाडूला यावेळी बुची बाबू स्पर्धेत चांगली कामगिरी करायची आहे. बराच काळ टीम इंडियातून बाहेर असलेला इशान किशनही पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात करत आहे. मध्य प्रदेशविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याने या संधीचा फायदा घेतला. प्रथमच मध्य प्रदेशचा संघ 225 धावा करून ऑलआऊट झाला होता, प्रत्युत्तरात झारखंडने 289 धावा केल्या होत्या. यावेळी इशान किशनने 114 धावांची स्फोटक खेळी केली होती. दुसऱ्या डावात मध्य प्रदेश संघ केवळ 238 धावा करू शकला. यानंतर झारखंडला विजयासाठी 138 धावांचे लक्ष्य होते.
कठीण परिस्थितीत मिळवला विजय
इशान किशनने मध्य प्रदेशविरुद्धच्या आपल्या कामगिरीने सर्व टीकाकारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याने पहिल्या डावात तीन शानदार झेल घेतले. याशिवाय त्याने शतकी खेळी खेळली. तर दुसऱ्या डावातही झारखंड संघ अडचणीत असताना त्याने 41 धावांची नाबाद खेळी करत संघाला विजयापर्यंत नेले. एकेकाळी झारखंडला विजयासाठी फक्त 12 धावांची गरज होती आणि त्यांनी आठ विकेट गमावल्या होत्या. यादरम्यान इशान किशनने तीन चेंडूत दोन षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला.
साहजिकच इशान किशनची ही कामगिरी भारतीय निवडकर्त्यांनाही प्रभावित करेल. या यष्टीरक्षक फलंदाजाने 2023 च्या अखेरीस दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर विश्रांती घेतली आणि तेव्हापासून तो संघाबाहेर आहे.
संबंधित बातमी :
Viral Video : 'लेडी बुमराह'चा कहर, तुफानी गोलंदाजीने उडवून दिली खळबळ; तुम्ही पाहिला का व्हिडिओ?
Pat Cummins : पॅट कमिन्सचा मोठा निर्णय! क्रिकेटमधून अचनाक घेतला ब्रेक; जाणून घ्या कारण
मोठी घोषणा! कसोटी क्रिकेटचं 150 वर्ष धुमधडाक्यात साजरं होणार; 'या' दोन संघांमध्ये होणार सामना