Suryakumar Yadav : भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. टी20 विश्वचषक 2022 (ICC T20 World Cup 2022)  सुरु होण्यापूर्वीही सूर्यकुमार यादवने सराव सामन्यातही कमाल फॉर्मात दिसत आहे. भारतीय संघ 23 ऑक्टोबरला टी-20 विश्वचषक 2022 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. त्याआधी भारत सराव सामनेही खेळत आहे. दरम्यान आज पार पडलेल्या भारत विरुद्ध वेस्टर्न ऑस्ट्रेलिया 11 या सराव सामन्यात टीम इंडियाने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा 13 धावांनी पराभव केला. यावेळी भारताकडून सूर्यकुमार यादवने अर्धशतक झळकावत सामना जिंकण्यात मोठा वाटा उचलला.


याचवेळी सूर्याने अर्धशतकही ठोकलं असून तो फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच भारतीय फॅन्सनी अगदी धिंगाना केला होता. सराव सामना असतानाही सूर्याच्या नावाने तुफान घोषणाबाजी ऑस्ट्रेलियात होत होती. सूर्याने सामन्याच्या या खेळीत 3 चौकार आणि 3 षटकार मारले. या सराव सामन्यात जेव्हा सूर्यकुमार यादवने अर्धशतक पूर्ण केले तेव्हा स्टेडियममध्ये सामना पाहणारे चाहते 'शॉट सूर्या' म्हणत या तुफान जल्लोष करत होते. हा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


पाहा व्हिडीओ -






भारत 13 धावांनी विजयी


भारत विरुद्ध वेस्टर्न ऑस्ट्रेलिया 11 या सामन्यात आधी फलंदाजी करत टीम इंडियाने 20 षटकांत 6 विकेट गमावत 158 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 145 धावा करू शकला. ज्यामुळे भारत 13 धावांनी विजयी झाला. भारताकडून सूर्यकुमारने अवघ्या 35 चेंडूत 52 धावा करत दमदार अर्धशतक झळकावलं. त्याचवेळी हार्दिक पांड्याने देखील महत्त्वपूर्ण अशा 29 धावा केल्या. याशिवाय दीपक हुडाने 22 आणि दिनेश कार्तिकने 19 धावांचे योगदान दिले. विशेष म्हणजे या सामन्यात रोहित शर्मासोबत ऋषभ पंत फलंदाजीला आला. पण दोघेही स्वस्तात माघारी परतले रोहितने 3 तर पंतने 9 रन केले. गोलंदाजीत अर्शदीपने कमाल कामगिरी केली. त्याने एकूण 3 विकेट्स घेतले. तर भुवनेश्वरनंही दोन विकेट्स घेतल्या.  


हे देखील वाचा-