IND vs SA, ODI Series : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या (IND vs SA ODI) मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना आज खेळवला जाणर आहे. मालिकेतील एक सामना भारताने तर एक दक्षिण आफ्रिकेने जिंकला आहे, त्यामुळे आज सामना जिंकणारा संघ मालिकाही जिंकणार आहे. तर अशा या दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाचा असणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्याबद्दलची माहिती जाणून घेऊ...
कधी आहे सामना?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा एकदिवसीय सामना आज अर्थात 11 ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सामना सुरु होईल. सामना सुरु होण्यापूर्वी अर्धातास नाणेफेक होणार आहे.
कुठे आहे सामना?
हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम (Arun Jaitley Cricket Stadium) येथे खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
आजची लढत निर्णायक
तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने 9 धावांनी गमावला होता. ज्यामुळे मालिकेतील पहिला सामना जिंकत दक्षिण आफ्रिकेने 1-0 ची आघाडी घेतली. ज्यानंतर दुसरा सामना भारताने 7 विकेट्सने जिंकत मालिकेत 1-1 ची बरोबरी घेतली आहे. ज्यानंतर आज होणारा तिसरा सामना जो संघ जिंकेल तो मालिकाही 2-1 ने खिशात घालणार आहे.
कसा आहे भारतीय संघ?
शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर.
हे देखील वाचा-