Suresh Raina Unsold:  भारतात सर्वाधिक लोक्रपिय असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पंधाराव्या हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे. नुकतंच आयपीएलचं मेगा ऑक्शन पार पडलं. या मेगा ऑक्शनमध्ये अनेक अनकॅप खेळाडूंवर फ्रँचायझीनं पैशांचा वर्षाव केलाय. तर, उत्कृष्ट खेळाडूंच्या यादीत येणारे क्रिकेटपटू अनसोल्ड ठरले. महत्वाचे म्हणजे, चेन्नईच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या सुरेश रैनाला संघानं खरेदी केलं नाही. ज्यामुळं चाहत्यांकडून चेन्नईच्या संघावर टीका केली जात आहे. नुकताच चेन्नईच्या संघानं सुरेश रैनाचा एक व्हिडिओ शेअर करीत जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. मात्र, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते चांगलेच भडकले आहेत. 


सीएसकेनं त्यांच्या अधिकृत ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये रैनाचे रेकॉर्ड आणि इतर अनेक चांगल्या आठवणींचा समावेश करण्यात आलाय. मात्र, रैनाच्या चाहत्यांना हा व्हिडिओ आवडला नाही. यावर चाहत्यांनी अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसेच चाहत्यांनी सीएसकेला शो ऑफ न करण्याचा सल्ला दिला.




सुरेश रैना ऑक्शनमध्ये अनसोल्ड ठरला
आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी चेन्नईच्या संघानं महेंद्र सिंह धोनी, ऋतुराज गाडकवाड, रविंद्र जाडेजा आणि मोईन अलीला कायम ठेवलं. परंतु, सुरेश रैनाला रिलीज केलं. सुरेश रैनाची मूळ किंमत 2 कोटी होती. मात्र, मेगा ऑक्शनमध्येच कोणत्याच संघानं त्याला विकत घेतलं नाही. एवढेच नव्हेतर, चेन्नईच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या सुरेश रैनाला सीएसकेनं विकत घेतलं नाही. ज्यामुळं सुरेश रैनाचे चाहते सीएसकेच्या संघावर भडकले आहेत. याशिवाय, दिग्गज क्रिकेटपटूंनीही सुरेश रैनाला कोणत्याही संघानं विकत न घेतल्यानं आश्चर्य व्यक्त केलंय. 


चेन्नईचा संघ
आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये चेन्नईच्या संघानं दीपक चहर, अंबाती रायुडू, ड्वेन ब्राव्हो, रॉबिन उथप्पा, हरी निशांत, ख्रिस जॉर्डन, मिचेल सँटनर, एम. जगदीशन. के. एस. आसिफ, तुषार देशपांडे, शिवम दुबे, महिश तितशाना, राज्यवर्धन हंगरगेकर, सिमरनजित सिंग, डेवॉन कॉनवे, ड्वेन प्रिस्टोरियस, अॅडम मिल्ने, एस. सेनापती, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, के. भगत वर्मा यांना विकत घेतलंय. 



हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha