रायपूर : टीम इंडियाचा माजी खेळाडू सुरेश रैना यानं छत्तीसगडमधील रायपूर येथे माध्यमांशी संवाद साधला. सुरेश रैनानं भारताच्या टी-20 वर्ल्ड कपमधील कामगिरीबाबत भाष्य केलं. सुरेश रैनानं यावेळी विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव फॉर्ममध्ये असल्याचं म्हटलं. तर, हार्दिक पांड्याविषयी देखील महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. हार्दिक पांड्या टीमचा उपकप्तान म्हणून चांगली कामगिरी करेल, असा विश्वास देखील सुरेश रैनानं व्यक्त केला.


सुरेश रैना काय म्हणाला?


भारताची टीम संतुलित आहे. रोहित शर्मा कॅप्टन असून विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये आहे. सूर्यकुमार यादव चांगल्या लयीत आहे. दोन लेफ्ट आर्म बॉलर आहेत. अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा आहे. जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज चांगली कामगिरी करत आहे. 


तिकडे मॅचेस सकाळी 10 वाजता सुरु होणार आहेत. लवकर आपण तिकडे जाऊन वातावरणाशी जुळवून घेऊ तितकं फायद्यात ठरेल, असं सुरेश रैनानं म्हटलं.  व्यवस्थापनानं चांगली टीम केलेली आहे, जितक्या लवकर तिकडे जाऊन जुळवून घेऊ ते फायदेशीर ठरेल.  तिकडच्या विकेट चांगल्या आहेत. अमेरिकेत क्रिकेट पुन्हा येत आहे. कॅनडात भारताचे यापूर्वीचे खेळाडू खेळले आहेत, असं देखील सुरेश रैनानं म्हटलं आहे. 


पाहा व्हिडीओ:






आपण कित्येक वर्ष टी-20 चांगली करतो, असं सुरेश रैना म्हणाला. पत्रकारांनी सुरेश रैनाला हार्दिक पांड्याला तो फॉर्ममध्ये नसल्यानं वगळलं जाईल का असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना सुरेश रैनानं मोठं वक्तव्य केलंय.  सुरेश रैना म्हणाला की हार्दिक पांड्या उप कप्तान त्याला ड्रॉप का करायचं, तो चांगली कामगिरी करत आहेत. एका दिवसात कुणाचा फॉर्म खराब होत नाही. हार्दिक पांड्या जेव्हा टी-20 वर्ल्ड कप खेळेल त्यावेळी तुम्हीच त्याचं भारत- पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये तो जेव्हा चांगली कामगिरी कराल तेव्हा कौतु कराल, असं सुरेश रैनानं म्हटलं. 


भारताचे सामने कधी? 


टीम इंडियानं 2007 च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये विजेतेपद मिळवलं होतं. भारतीय संघ दोन टप्प्यात टी-20 वर्ल्डकपसाठी रवाना होणार आहे. भारताचा सराव सामना बांगलादेश विरुद्ध 1 जूनला होणार आहे. त्यानंतर मुख्य स्पर्धेत 5 जूनला आयरलँड विरुद्ध भारताची मॅच होईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत 9 जूनला होईल. त्यानंतर अमेरिकेविरुद्ध 12 जून आणि  कॅनडा विरुद्ध 15 जून रोजी भारताची मॅच होणार आहे. 


संबंधित बातम्या : 


हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली


विजयाच्या जल्लोषात आरसीबीच्या खेळाडूंकडून धोनीचा अपमान? इंग्लंडच्या माजी कॅप्टननं सुनावले खडेबोल, पाहा व्हिडीओ