T20 World Cup 2024, Indian Cricket Team : आयपीएलच्या थरारानंतर टी20 विश्वचषकाचा रनसंग्राम सुरु होणार आहे. त्याआधी टीम इंडियाबाबतची मोठी माहिती समोर आली आहे. भारतीय संघ अमेरिकेला जाणार असलेल्या तारखांमध्ये बदल झालाय. भारतीय संघ आणि सपोर्ट स्टाफ दोन टप्प्यात विश्वचषकासाठी रवाना होणार आहेत. 25 मे आणि 27 मे आशा दोन टप्प्यामध्ये टीम इंडिया रवाना होणार आहे. याआधीच्या वृत्तानुसार, 21 मे रोजी पहिल्या टप्प्यातील खेळाडू रवाना होणार होते. पण शड्युलमध्ये बदल करण्यात आला आहे. आता पहिल्या टप्प्यातील खेळाडू 25 मे रोजी रवाना होणार आहेत.
रोहित शर्मासोबत हे खेळाडू पहिल्या टप्प्यात रवाना होणार -
पीटीआयने दिलेल्या माहतीनुसार, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माशिवाय उपकर्णधार हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, शिवम दुबे, अर्शदीप सिंह, अक्षर पटेल आणि सपोर्ट स्टाफ पहिल्या टप्यात रवाना होणार आहेत. 25 मे रोजी हे खेळाडू न्यूयॉर्कसाठी रवाना होणार आहेत.
27 मे रोजी उर्वरित सर्व खेळाडू न्यूयॉर्कसाठी रवाना होणार आहेत. त्यामध्ये राजस्थान, कोलकाता, आरसीबी संघातील खेळाडूंचा समावेश असेल. त्यामध्ये विराट कोहली, संजू सॅमसन, मोहम्मद सिराज, रिंकू सिंह यांचा समावेश असेल.
भारतीय संघ विश्वचषकात कुणासोबत भिडणार ?
भारतीय संघाचा पहिला वॉर्मअप सामना बांगलादेशविरोधात खेळणार आहे. 1 जून रोजी भारतीय संघ वॉर्मअप सामना खेळणार आहे. त्यानंतर 5 जून रोजी भारतीय संघ विश्वचषकाच्या अभियानाला सुरुवात करणार आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यामध्ये हा सामना होईल. त्यानंतर 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात आमनासामना होणार आहे.
आयरलँड आणि पाकिस्तान यांच्यानंतर भारतीय संघ कॅनडाविरोधात खेळणार आहे. पहिले तिन्ही सामने न्यूयॉर्कच्या नासाऊ क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. गेल्या महिन्यातच विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. रोहित शर्माकडे कर्णधारपद तर हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. संजू सॅमसन आणि ऋषभ पंत विकेटकीपर असतील.
टी20 वर्ल्ड कपसाठी भारताच्या ताफ्यात कोण कोणते खेळाडू ?
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्रर जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, युजवेंद्रर चहल, संजू सॅमसन (विकेटकीपर), मोहम्मद सिराज
राखीव खेळाडू -
शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद आणि आवेश खान