India vs New Zealand : भारतीय संघाचं (Team India) नव्या वर्षातील वेळापत्रक कमालीचं व्यस्त दिसून येत आहे. नुकताच श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. भारताने एकदिवसीय आणि टी20 दोन्ही मालिकांमध्ये श्रीलंकेल मात दिल्यावर आचा भारत न्यूझीलंडविरुद्ध सामन्यांसाठी सज्ज झाला आहे. न्यूझीलंडचा संघ (New Zealand tour of India) भारत दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यामध्ये तीन एकदिवसीय सामन्यांसह तीन टी20 सामने खेळवले जाणार आहेत. उद्या म्हणजेच मंगळवारपासून (18 जानेवारी) तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे आणि 27 तारखेनंतर टी20 सामने खेळवले जाणार आहेत. तर सर्वात आधी होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांची सविस्तर माहिती जाणून घेऊ...

यंदा म्हणजेच 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषक 2023 खेळवला जाणार आहे. यंदा ही स्पर्धा भारतीय भूमीत पार पडणार आहे. 2011 नंतर पुन्हा एकदा भारताला यजमानपद मिळालं असून 2011 ची पुनरावृत्ती करुन भारत पुन्हा एकदा विश्वचषक उंचावण्यासाठी सज्ज झाला आहे. त्या दृष्टीने आता अधिक एकदिवसीय सामने भारत खेळत असून न्यूझीलंडविरुद्ध आता तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारत खेळत आहे. या मालिकेआधी नुकताच भारताने श्रीलंकेला एकदिवसीय मालिकेत 3-0 असा दारुण परभव केला होता. तर भारत आणि न्यूझीलंड एकदिवसीय सामन्याचं वेळापत्रक पुढीलप्रमाणे...

सामना तारीख ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 18 जानेवारी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद
दुसरा एकदिवसीय सामना 21 जानेवारी शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियम, रायपूर
तिसरा एकदिवसीय सामना 24 जानेवारी  होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदोर

कसे आहेत दोन्ही संघ?

भारताचा एकदिवसीय संघ: 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार)वॉशिंगट सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराद, उमरान मलिक 

न्यूझीलंडचा एकदिवसीय संघ:

फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकिपर/कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, जेकब डफी, डग ब्रेसवेल, मार्क चॅपमन, हेन्री शिपले

कधी, कुठे पाहू शकता सामना?

भारत विरुद्ध न्यूझीलंड या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच Sony Liv अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   

एकदिवसीय सामन्यानंतर टी20  सामने
 
एकदिवसीय सामन्यानंतर भारत न्यूझीलंडविरुद्ध तीन टी20 सामने खेळणार आहे. भारतीय संघ सध्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटवर अधिक लक्ष्य देत असल्याने टी20 सामन्यांच्या मालिकेत युवा खेळाडूंना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तर सध्या जाहीर केलेल्या संघातील खेळाडू कोणते ते पाहू...

भारताचा टी20 संघ

हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उप कर्णधार), इशान किशन (विकेटकिपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (विकेटकिपर) , वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार 

भारत आणि न्यूझीलंड टी20 मालिकेचं वेळापत्रक:

सामना तारीख ठिकाण
पहिला टी-20 सामना  27 जानेवारी 2023 रांची
दुसरा टी-20 सामना 29 जानेवारी 2023 लखनौ
तिसरा टी-20 सामना 01 फेब्रुवारी 2023 अहमदाबाद

हे देखील वाचा-