Rishabh Pant News : भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू फलंदाज ऋषभ पंत (Rishabh pant) याचा 30 डिसेंबर 2022 रोजी कार अपघात झाला. या अपघातात पंतला गंभीर दुखापत झाली होती. दरम्यान पंतच्या अपघातानंतर (Rishabh Pant Car Accident) तेथील काही प्रत्यक्षदर्शींनी त्याला मदत केली. यावेळी रजत कुमार आणि निशू कुमार या दोन मुलांनी त्याला बरीच मदत केली होती. दोघेही पंतसाठी अगदी देवदूत बनून पोहोचले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी पंतची रुग्णालयाच जाऊन भेटही घेतली. आता पंतने सोशल मीडियाच्या माध्यमातून रजत कुमार आणि निशू कुमार या दोघांचे आभार मानले आहेत. या दोन्ही मुलांसाठी ऋषभने एक ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांने तो कायम त्यांचा ऋणी राहिल असही म्हटलं आहे.
ख्रिसमस सेलिब्रेट करून दुबईहून परतलेला ऋषभ पंत 30 डिसेंबरला दिल्लीहून रुरकीला जात होता. यादरम्यान त्याची कार मोहम्मदपूर जतजवळ दुभाजकाला धडकली आणि आग लागली. या भयानक अपघातात पंत गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर निशू आणि रजत या दोघांनी पंतला खूप मदत केली. दोघांनी पंतला हॉस्पिटलमध्ये नेण्याची संपूर्ण व्यवस्था केली. ज्यानंतर पंतची रुग्णालयात त्यांनी भेटही घेतली. ज्यानंतर आता पंतने दोघांचे आभार मानत खास ट्वीट केलं आहे.
ऋषभ पंतची सोशल मीडिया पोस्ट-
पंतने रजत आणि निशूचा फोटो ट्वीटरवर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी प्रत्येकाचे वैयक्तिकरित्या आभार मानू शकत नाही. पण मी या दोघांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी अपघातानंतर मला मदत केली आणि सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचवले. रजत कुमार आणि निशू कुमार, धन्यवाद! मी सदैव तुमचा ऋणी राहीन.
हे देखील वाचा-