Sunil Gavaskar on Sarfaraz Khan : भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी यंदाच्या रणजी स्पर्धेतील मालिकावीर सरफराज खानबाबत (Sarfaraz Khan) मोठं वक्तव्य केलं आहे. सरफराजने रणजी सामन्यांत केलेल्या जबरदस्त कामगिरीनंतरही त्याला पुढील कसोटी मालिकेत भारतीय संघात स्थान मिळालं नाही तर ही अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट असेल, असं गावस्कर म्हणाले आहेत.


मिड-डे वृत्तपत्रासाठी गावस्कर यांनी लिहिलेल्या कॉलममध्ये त्यांनी हे लिहिलं आहे. त्यांनी लिहिलं की, 'सरफराजने रणजीमध्ये ठोकलेल्या सलग शतकांमुळे त्याच्यासाठी टीम इंडियामध्ये येण्याची संधी निर्माण झाली आहे. अजिंक्य रहाणे सध्या संघाबाहेर असून पुजाराकडे जागा वाचवण्याची अखेरची संधी आहे, अशामध्ये सरफराजसाठी संघाचे दरवाजे खुलू शकतात. त्याने निवडकर्त्यांचं दार ठोकलं असून जर तरीही तो पुढील कसोटी सामन्यात भारतीय संघात नसेल तर ही खूप आश्चर्याची गोष्ट असेल.'


सरफराज खाननं ठोकली 4 शतकं


रणजी ट्रॉफी 2021-22 (Ranji Trophy Season 2021-22) या स्पर्धेचं जेतेपद मुंबईच्या (Mumbai) हातातून हुकलं. 41 वेळा विजयी मुंबईला 42 व्यांदा विजय मिळवता आला नाही. पण मुंबईचा फलंदाज सरफराज खान (Sarfaraz Khan) याने मात्र अप्रतिम फलंदाजी करत मालिकावीराचा पुरस्कार मिळवला.त्याने या स्पर्धेत 4 शतकं आणि 2 अर्धशतकं ठोकली. अंतिम सामन्यात मुंबई जरी पराभूत झाली असली तरी सरफराजनं या सामन्यातही पहिल्या डावात शतक ठोकलं.


122.75 च्या सरासरीने ठोकले 982 रन


संपूर्ण मालिकेत सरफराज खानने (Sarfaraz Khan) त्याचं बॅटिंग अॅव्हरेजही कमाल ठेवलं. सरफराजने 6 सामन्यातील 9 डावात 122.75 च्या सरासरीने आणि 69.54 च्या स्ट्राईक रेटने (Strike Rate) धावा कुटल्या. 982 धावा करणाऱ्या सरफराजचा 275 सर्वोच्च स्कोर ठरला, यावेळी त्याने 93 चौकार आणि 19 षटकार लगावले.


हे देखील वाचा -