IND vs ENG, 5th Test : ऋषभ पंत (146) चे वादळी शतक आणि रवींद्र जाडेजाचे (नाबाद 83) संयमी अर्धशतक याच्या बळावर भारताने पहिल्या दिवसाअखेर 73 षटकांमध्ये सात गड्यांच्या मोबदल्यात 338 धावांचा डोंगर उभारलाय. ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजा यांनी द्विशतकी भागिदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. इंग्लंडच्या भेदक माऱ्यापुढे भारताचे फलंदाज एकापाठोपाठ एक माघारी परतले. सलामीवीर गिल, पुजारा स्वस्तात बाद झाले. मग कोहली, विहारी आणि श्रेयस अय्यर यांनीही लगेचच तंबूचा रस्ता धरला. 100 धावांच्या आत भारताचे पाच फलंदाज बाद झाले होते. शिभमन गिल (17), चेतेश्वर पुजारा (13), हनुमा विहारी (20), विराट कोहली (11) आणि श्रेयस अय्यर (15) स्वस्तात बाद झाले. आघाडीचे पाच फलंदाज बाद झाल्यानंतर मोक्याच्या क्षणी पंतने रवींद्र जाडेजाच्या जोडीने भारताचा डाव सावरला. पंत आणि जाडेजाने यांनी सहाव्या गड्यासाठी 222 धावांची भागिदारी केली. त्यानंतर शार्दुल ठाकूर एक धाव काढून माघारी परतला. त्यानंतर रवींद्र जाडेजाने शामीसोबत भारताची धावसंख्या वाढवली. दिवसाअखेर रवींद्र जाडेजा 83 धावांवर खेळत आहे. तर मोहम्मद शामीही नाबाद आहे.
पंत-जाडेजाने डाव सावरला :
ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजाने द्विशतकी भागिदारी करत भारताचा डाव सावरला. पंतने 146 धावांची खेळी केली. पंतने 111 चेंडूमध्ये 146 धावांची विस्फोटक खेळी केली. या खेळीदरम्यान पंतने चार षटकार आणि 19 चौकार लगावले. 98 धावांवर भारताचे पाच गडी गमावले तेव्हा पंत आणि जाडेजा यांनी 222 धावांची भागिदारी करत भारताचा डाव सावरला. ऋषभ पंत विस्फोटक फलंदाजी करत असताना रवींद्र जाडेजाने संयमी फलंदाजी करत साथ दिली. रवींद्र जाडेजानेही 109 चेंडूत अर्धशतक झळकावले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रवींद्र जाजेडा 83 धावांवर नाबाद आहे.
जेम्स अँडरसनचा भेदक मारा :
पहिल्या दिवशी जेम्स अँडरसन याने भेदक मारा केला. त्याने पहिल्या दिवशी आघाडीच्या तीन भारतीय खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. मॅथ्यू पॉट्सने दोन तर स्टोक्स आणि जो रुट यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेत अँडरसनला चांगली साथ दिली.
पहिल्या दिवशी भारताची फलंदाजी -
फलंदाजी | धावा | चेंडू | चौकार | षटकार |
शुभमन गिल | 17 | 24 | 4 | 0 |
चेतेश्वर पुजारा | 13 | 46 | 2 | 0 |
हनुमा विहारी | 20 | 53 | 1 | 0 |
विराट कोहली | 11 | 19 | 2 | 0 |
ॠषभ पंत | 146 | 111 | 19 | 4 |
श्रेयस अय्यर | 15 | 11 | 3 | 0 |
रवींद्र जडेजा (नाबाद) | 83 | 163 | 10 | 0 |
शार्दुल ठाकूर | 1 | 12 | 0 | 0 |
मोहम्मद शमी (नाबाद) | 0 | 11 | 0 | 0 |
मोहम्मद सिराज | ||||
जसप्रीत बुमराह |
इंग्लंडची गोलंदाजी
गोलंदाजी | षटकं | निर्धाव षटकं | धावा | विकेट |
जेम्स अँडरसन | 19 | 4 | 52 | 3 |
स्टुअर्ट ब्रॉड | 15 | 2 | 53 | 0 |
मॅथ्यू पॉट्स | 17 | 1 | 85 | 2 |
जॅक लीच | 9 | 0 | 71 | 0 |
बेन स्टोक्स | 10 | 0 | 34 | 1 |
जो रूट | 3 | 0 | 23 | 1 |
कोण कधी झाले बाद? | |
शुभमन गिल | 1-27 (6.2) |
चेतेश्वर पुजारा | 2-46 (18) |
हनुमा विहारी | 3-64 (22.2) |
विराट कोहली | 4-71 (24.2) |
श्रेयस अय्यर | 5-98 (27.5) |
ॠषभ पंत | 6-320 (66.2) |
शार्दुल ठाकूर | 7-323 (68) |