India vs Ireland Live : भारत आणि आयर्लंड (India vs Ireland) यांच्यातील दोन टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे उशीरा सुरु झाला. पण 12 षटकांच्या या सामन्यात भारतानेच विजय मिळवला. ज्यानंतर आता दौऱ्यातील दुसरा आणि अखेरचा सामना आज खेळवला जाणार आहे. आजचा सामना जिंकून आयर्लंडचा संघ मालिका बरोबरीत सोडण्याचा प्रयत्न करेल, तर भारत सामना जिंकून क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न करेल. तर हा सामना कधी, कुठे पाहता येईल याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...


कधी आहे सामना?


आज 28 जून रोजी होणारा भारत आणि आयर्लंड हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 9 वाजता सुरु होईल. 8 वाजून 30 मिनिटांनी नाणेफेक होईल.  


कुठे आहे सामना?


हा सामना आयर्लंडच्या डबलिन क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.


कुठे पाहता येणार सामना?


भारत आणि आयर्लंड हा आजचा सामना सोनी सिक्स चॅनेलवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच सोनी लिव्ह (Sony Liv) अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे लाईव्ह कव्हरेज पाहता येईल.  


भारत विरुद्ध आयर्लंड Head to Head


भारत आणि आयर्लंड यांच्यात आतापर्यंत 4 टी-20 सामने खेळवले गेले आहे. या सर्व सामन्यात अपेक्षेप्रमाणे भारताचचं पारडं जड दिसून आलं आहे. कारण चार पैकी चारही सामन्यात भारतानं बाजी मारली आहे. तर, आयर्लंड संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे आता आजचा सामना जिंकून भारत आपला विजयी रथ कायम ठेवायचा प्रयत्न करेल. तर आयर्लंड किमान  आजच्या सामन्यात विजय मिळवून भारताविरुद्ध पहिला-वहिला विजय मिळवू इच्छित असेल.



हे देखील वाचा -