IPL 2024 Winner : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल 2024 प्लेऑफच्या सामन्याला सुरुवात झाली. कोलकाता, हैदराबाद, राजस्थान आणि आरसीबी यांच्यामध्ये चषकासाठी आमनासामना होणार आहे. क्वालिफायर 1 साठी आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यामध्ये लढत सुरु आहे. 22 मार्च रोजी राजस्थान आणि आरसीबी यांचा आमनासामना होणार आहे. प्लेऑफचे सामने सुरु झाल्यानंतर आयपीएल 2024 विजेत्याबाबात वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. भारताचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर यांनीही यंदाच्या विजयाचं भाकीत केलेय. गावसकरांच्या मते, यंदाचा आयपीएल चषकावर आरसीबी नाव कोरेल. गावस्कारांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.


कोलकाता आणि हैदराबाद यांच्यातील क्वालिफायर सामन्याआधी स्टार स्पोर्ट्सवर समालोचकांनी विजेत्याबाबत अंदाज व्यक्त केला. सुनिल गावस्कर यांनी आरसीबीला विजयाचा दावेदार असल्याचं सांगितले. त्याशिवाय चेन्नईचा माजी खेळाडू अंबाती रायडू यानेही आरसीबीवरच डाव खेळला. अंबाती रायडू म्हणाला की, दबावात आरसीबीला शानदार खेळताना कधीच पाहिले नाही. यंदाच्या हंगामात आरसीबीने शानदार खेळ केलाय. यंदाच्या हंगामात आरसीबी वेगळ्या पद्धतीने आपली छाप सोडत आहे. 






आरसीबीचे शानदार कमबॅक -


नाही नाही म्हणत, आरसीबीने प्लेऑफमध्ये प्रवेश केला. आयपीएल 2024 च्या पहिल्या टप्प्यातील सामन्यानंतर आरसीबी प्लेऑफमध्ये पोहचणार नाही, असे सर्वांनीच भाकीत केले होते. पण आरसीबी खेळाडू आणि चाहत्यांना विश्वास होता. आरसीबीने दुसऱ्या टप्प्यात आपला खेळ उंचावला. फक्त एक टक्क्यांची संधी त्यांनी 100 टक्के करुन दाखवली. आरसीबीच्या कमबॅकची स्टेरी एखाद्या प्रेरणादायक चित्रपटाप्रमाणेच आहे. कुणालाच आरसीबीवर विश्वास नव्हता, पण त्यांनी सर्वांना फेल ठरवत आपलं भविष्य स्वत: लिहिले. दुसऱ्या टप्प्यात लागोपाठ सहा सामन्यात विजय मिळवत प्लेऑफचं तिकिट मिळवले. 


आरसीबी पहिल्या टप्प्यात गुणतालिकेत दहाव्या क्रमांकावर होती. आठ सामन्यातील सात सामने गमावले होते. पण दुसऱ्या टप्प्यात त्यांनी शानदार कमबॅक केले. लागोपाठ सहा सामन्यात मोठा विजय मिळवत प्लेऑफमधील स्थान निश्चित केले. आयपीएलच्या 17 वर्षांच्या इतिहासातील हे सर्वात मोठं कमबॅक ठरले. मोक्याच्या सामन्यात आरसीबीने बलाढ्या आणि पाच वेळच्या विजेत्या चेन्नईचा 27 धावांनी धुराळा उडवला अन् प्लेऑफचं तिकिट मिळवले. आरसीबी प्लेऑफमध्ये पोहचल्यानंतर चाहत्यांच्या आनंदाला पारवार उरला नाही. आरसीबीला आता रोखणं कठीण असल्याच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. चाहत्यांसोबतच समालोचकांनीही आरसीबी यंदा चषकावर नाव कोरेल, असा अंदाज वर्तवलाय.