South Africa vs India, 2nd Test :  भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या जोहान्सबर्ग येथील द वांडरर्स स्टेडियममध्ये (The Wanderers Stadium, Johannesburg) दुसरा कसोटी सामना सुरु आहे. तीन सामन्याच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. अशात यजमान दक्षिण आफ्रिका संघासाठी हा सामना महत्वाचा आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात पंच अल्लाउद्दीन पालेकर (Allahudein Palekar) सर्वाधिक चर्चेत राहिलेत. कारण, या कसोटी सामन्यात भारतीय वंशाचे अल्लाउद्दीन पालेकर मुख्य पंचांची भूमिका बजावत आहेत. तब्बल 15 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अल्लाउद्दीन पालेकर यांना पहिल्यांदाच कसोटी सामन्यात पंचगिरी करण्याची संधी मिळाली आहे. 


आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात अल्लाउद्दीन पालेकर यांनी क्रीडा चाहत्यांना प्रभावित केलं आहे. अल्लाउद्दीन पालेकर दक्षिण आफ्रिकाकडून पंचगिरी करत असले तरी त्यांचं भारतासोबत खास नाते आहे. अल्लाउद्दीन पालेकर मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील राहणारे आहेत.  पालेकरांची पंचगिरी पाहून खेडकरांची छाती अभिमानेने फुलली असेल. पालेकर माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आहेत, त्यांचे वडिलांनीही पंचगिरी केली आहे. 44 वर्षीय पालेकर यांनी 2014-15 मध्ये वानखेडे मैदानावर रणजी सामन्यात पंचगिरी केली होती. पालेकर यांनी भारतीय पंच कृष्णमाचारी श्रीनिवासन यांच्यासोबत मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यातील सामन्यात पंचगिरी केली होती.  


अल्लाउद्दीन पालेकर दक्षिण आफ्रिकेचे 57 वे पंच आहेत. तर जगभरातील 497 वे पंच ठरले आहेत.  अल्लाउद्दीन पालेकर मरायस इरास्मस यांना आपले गुरू मानतात. पालेकर यांनी गुरुच्या साथीने आपल्या कसोटी कारकिर्दीला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे अल्लादीन पालेकर यांचे वडील आणि काकासुद्धा पंच आहेत. पालेकर यांनी 15 वर्षापूर्वी क्रिकेटमधून सन्यास घेत पंचगिरीमध्ये नशीब अजमावले होते. 44 वर्षीय अल्लाउद्दीन 2006 पर्यंत दक्षिण आफ्रिकामधील टायटन्स संघाकडून क्रिकेट खेळले होते. 2018 मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांत्यातील एकदिवसीय मालिकेत मैदानावरील पंचाची भूमिका पार पाडली होती. 


संबधित बातम्या :


 Ind vs SA, 2nd Test : फलंदाजी करताना बुमराह आफ्रिकेच्या मार्कोला भिडला, दोघांमध्ये वादावादी, पाहा VIDEO
India vs South Africa : वांडर्सच्या मैदानावर कोण जिंकणार? पाहा आकडे काय सांगतात


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live