Ind vs SA, 2nd Innings Highlights: भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील दुसऱ्या कसोटीत भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघाचे खेळाडू उत्तम कामगिरी करत आहेत. चुरशीचा खेळ सुरु असताना खेळाडूंमध्ये वादावादी होण्याची घटनाही समोर आली आहे. फलंदाजी करताना भारताचा जसप्रीत बुमराह आणि दक्षिण आफ्रिकेचा युवा गोलंदाज मार्को जॅन्सेन या दोघांमध्ये बाचाबाची झाल्याचं समोर आलं आहे. 


हा संपूर्ण प्रकार 55 वी ओव्हर सुरु असताना घडला. बुमराह फलंदाजी करताना मार्को गोलंदाजी करत होता. यावेळी एका चेंडूनंतर मार्कोने बुमराहवर काहीतरी प्रतिक्रिया केली. ज्यानंतर बुमराहनेही त्याला रिप्लाय करत थेट अंगावर गेला. त्यानंतर दोघांमध्ये वादावादी झालेली पाहून पंचाना त्यामध्ये येऊन सोडवासोडवी करावी लागली.



आतापर्यंत सामन्यात प्रथम फलंदाजी घेतल्यानंतर भारताने पहिल्या डावात 202 धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने फलंदाजी करत पहिल्या दिवसाअखेर 1 विकेट गमावत 35 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शार्दूलने 7 विकेट खिशात घालत आफ्रिकेला 229 धावांत सर्वबाद केलं. ज्यानंतर भारताने दुसरा डाव खेळण्यास सुरुवात केली.  भारताचे बहुतांश फलंदाज फेल झाले. मात्र अनुभवी अजिंक्य रहाणेने 58 आणि चेतेश्वर पुजाराने 53 धावा केल्या. तसंच अखेरपर्यंत क्रिजवर राहून हनुमा विहारीने महत्त्वपूर्ण अशा नाबाजद 40 धावा केल्यामुळे भारताचा डाव 200 पार गेला. ज्यामुळे विजय मिळवण्यासाठी आफ्रिकेला 240 धावांची गरज होती. पण आफ्रिकेने या आव्हानाचा पाठलाग दमदार पद्धतीने सुरु केला आहे. 118 धावा करुन त्यांनी 2 विकेट्स गमावल्याने उर्वरीत 122 धावा करताना त्यांच्या हातात 8 विकेट्स आहेत. 


हे ही वाचा - 



मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live