India vs South Africa Head to Head Record: भारत- दक्षिण आफ्रिकेतील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना आज खेळला जात आहे. हा सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर संध्याकाळी सात वाजल्यापासून खेळवला जाईल. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 2-1 नं आघाडी घेतली आहे. आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. तर, आजच्या सामन्यात विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेचा मालिकेवर कब्जा करण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 सामन्यात कोणत्या संघाचं पारडं जडं आहे? यावर एक नजर टाकुयात.
या मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारतीय संघानं तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून मालिकेतील आव्हान जिवंत ठेवलं. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं सात विकेट्सनं विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही भारताला चार विकेट्सनं धुळ चाखली. मात्र, तिसऱ्या आणि महत्वाच्या सामन्यात भारतानं 48 धावांनी दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलंय.
भारत- दक्षिण आफ्रिका हेट टू हेड रेकार्ड
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण 18 सामने खेळले गेले. त्यापैकी भारतीय संघानं 10 सामने जिंकले आहेत. तर, आठ सामन्यात पराभव पत्कारावा लागलाय. महत्वाचं म्हणजे, भारतीय संघानं मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सात सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन सामने जिंकले आहेत. तर, पाच सामन्यात पराभव स्वीकारला आहे.
भारताचा संभाव्य संघ-
इशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार आणि युझवेंद्र चहल.
दक्षिण आफ्रिकेचा संभाव्य संघ-
क्विंटन डी कॉक/रीझा हेंड्रिक्स, टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसीव्हेन डर ड्युसेन, डेव्हिड मिलर, हेन्रिक क्लासेन (विकेटकीपर), ड्वेन प्रिटोरियस, वेन पारनेल, कागिसो रबाडा, केशव महाराज, एनरिके नॉर्खिया, तबरेज शम्सी.
हे देखील वाचा-