IND vs SA, 4th T20: भारत आण दक्षिण आफ्रिका यांच्यात आज चौथ्या टी-20 सामना खेळला जाणार आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने गमावून भारतीय संघानं तिसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवलाय. मात्र, त्यानंतही या मालिकेत भारतीय संघ अजूनही 2-1 नं पिछाडीवर आहे. या मालिकेतील तिन्ही सामन्यात भारतीय संघात कोणताही बदल पाहायला मिळाला नाही. परंतु, या तिन्ही सामन्यात संधी मिळालेल्या आवेश खाननं निराशाजनक कामगिरी करून दाखवली. त्याला या मालिकेत एकही विकेट्स मिळवता आली नाही. यामुळं त्याच्याऐवजी उमरान मलिक (Umran Malik) आणि अर्शदीप सिंहला (Arshdeep Singh) संधी मिळू शकते. यावर भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चौप्रानं (Aakash Chopra) भाष्य केलंय. 


आकाश चोप्रानं काय म्हटलंय?
आकाश चोप्रानं आपल्या युट्युब चॅनलवर बोलताना म्हटलंय की, "मालिकेत आवेश खानला आतापर्यंत एकही विकेट्स मिळाली नाही. त्यामुळं भारतीय संघात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याच्या जागेवर उमराम किंवा अर्शदीप यापैकी कोणत्या गोलंदाजाला संधी मिळते, हे पाहणे महत्वाचं असेल. तसेच भारतीय संघानं कोणताही बदल न केल्यास काही फरक पडणार नाही", असंही आकाश चोप्रानं म्हटलंय.


दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मालिकेत भारतीय गोलंदाजांची कामगिरी
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या टी-20 मालिकेत एकही विकेट्स न घेता आलेला आवेश खान एकमेव गोलंदाज आहे. त्यानं तीन सामन्यात 11 षटक टाकली. ज्यात 7.90 च्या सरासरीनं 87 धावा दिल्या आहेत. भारताचे वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेलनं या मालिकेत 6-6 विकेट्स घेतल्या आहेत. तर, युजवेंद्र चहलनं चार आणि अक्षर पटेलनं दोन विकेट्स घेतल्या आहेत. 


उमरान आणि अर्शदीपला पदार्पणाची प्रतिक्षा
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना उमरान मलिकनं दमदार कामगिरी केली. दरम्यान, उमरान मलिकनं आपल्या वेगानं संपूर्ण क्रिडाविश्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. या हंगामात त्यानं सातत्यानं 150 किमी/प्रतितास वेगानं गोलंदाजी केलीय. तसेच मधल्या फळीत त्यानं अनेक विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत उमरान मलिक चौथ्या क्रमांकावर आहे. अर्शदीप सिंहनं आयपीएलमध्ये डेथ ओव्हर्समध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. डेथ ओव्हरमध्ये त्यानं अनेक फलंदाजांचे हात बांधून ठेवले. सध्या दोन्ही खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याच्या प्रतिक्षेत आहेत.


हे देखील वाचा-