IND vs SA: भारताचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेच्या तडाखेबाज फलंदाजाचं संघात पुनरागमन होण्याची शक्यता
IND vs SA: भारत- दक्षिण आफ्रिका (India vs South Africa 4th T20) यांच्यात आज पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना खेळला जाणार आहे.
IND vs SA: भारत- दक्षिण आफ्रिका (India vs South Africa 4th T20) यांच्यात आज पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना खेळला जाणार आहे. राजकोटच्या (Rajkot) सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Saurashtra Cricket Association Stadium) हा सामना पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाची चिंता वाढवणारी माहिती समोर येत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या तडाखेबाज फलंदाज आणि विकेटकिपर क्विंटन डी कॉकचं (Quinton de Kock) संघात पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यानंतर क्विंटन डी कॉकला दुखापत झाली होती. ज्यामुळं त्याला भारताविरुद्ध दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-20 सामन्याला मुकावं लागलं होतं. पहिल्या सामन्यात क्विंटन डी कॉकनं 22 धावांची खेळी केली होती. महत्वाचं म्हणजे, आजच्या सामन्यात क्विंटन डी कॉकचं पुनरागमन झाल्यास भारतीय संघासमोर मोठं आव्हान उभ राहण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिका संघ व्यवस्थापनानं काही तासांपूर्वी क्विंटन डी कॉकच्या दुखापतीबाबत माहिती दिली होती. क्विंटन डी कॉक दुखापतीतून सावरत आहे. दक्षिण आफ्रिकेचा वैद्यकीय संघ त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. लवकरच डी कॉक चौथा टी-20 सामना खेळणार की नाही? याबाबत माहिती दिली जाईल.
दक्षिण आफ्रिकेचा संघ 2-1 आघाडीवर
भारताविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ 2-1 नं आघाडीवर आहे. पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेच्या संघानं मालिकेत 2-0 नं आघाडी घेतली. त्यानंतर विशाखापट्टम येथे तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून मालिकेतील आव्हान जिवंत ठेवलंय. या मालिकेतील चौथा सामना आज खेळला जाणार आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ-
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नोर्किया, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरीझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रॅसेन्को डुसेन, ट्रिस्टन स्टब्स.
हे देखील वाचा-