IND vs SA: भारत- दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला उद्यापासून (3 जानेवारी) जोहान्सबर्ग येथे सुरुवात होणार आहे. सोमवारपासून सुरु होणाऱ्या या लढतीच्या पूर्वसंध्येला भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी राहुल द्रविडनं 100 व्या कसोटी सामन्याच्या एक दिवस आधी पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती दिलीय.


"केपटाऊनमध्ये विराट कोहली त्याचा 100वा कसोटी खेळणार आहे. जर तेव्हा त्यांनं पत्रकार परिषदेत हजेरी लावली तर, तो मोठा इव्हेंट होईल. तेव्हा पत्रकार त्याला 100 व्या कसोटीबाबत प्रश्न विचारू शकतील. त्याच्यासोबत हा सेलिब्रेटही करू शकतील. पण माझ्या माहितीत तो आजच्या पत्रकार परिषदेत नसण्यामागे काहीच कारण नाही, असं राहुल द्रविडनं पत्रकार परिषदेत म्हटलंय. 


विराटला मागील दोन वर्षांत एकही आतंरराष्ट्रीय शतक झळकावता आलेलं नाही. जोहान्सबर्ग मैदानावर त्यांनं चांगली कामगिरी केलीय. या मैदानावर त्यानं दोन कसोटी सामने खेळले आहेत. यात त्यानं 77. 50 च्या सरासरीनं 310 धावा केल्या आहे. यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. 


विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने सेंच्युरियन कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा 113 धावांनी पराभव करून इतिहास रचला. टीम इंडिया सध्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्ग येथे खेळला जाणार आहे. भारतानं जोहान्सबर्ग मैदानावर आतापर्यंत चांगल प्रदर्शन करून दाखवलंय. भारतानं जोहान्सबर्ग मैदानावर भारतानं एकूण पाच कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी भारतानं दोन जिंकले आहेत. तर, तीन सामने अनिर्णित राहिले आहेत. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha