Somerset vs Sussex T20 Blast 2022: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) उत्कृष्ट गोलंदाज टायमल मिल्सला (Tymal Mills) आयपीएलच्या पंधराव्या हंगामात (IPL 2022) जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. परंतु, काहीच सामन्यात जबरदस्त कामगिरी करत त्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आता तो टी-20 ब्लास्टमध्ये खेळत आहे. ससेक्स आणि सॉमरसेट यांच्यातील सामन्यात त्यानं अप्रतिम झेल घेतला. त्याच्या झेलचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सनं ट्विटरवर शेअर केला आहे. मिल्सच्या या झेलचं चाहते खूप कौतुक करत आहेत.


समरसेटविरुद्ध टायमल मिल्सची भेदक गोलंदाजी
ससेक्स आणि समरसेट यांच्यात काल (1 जून 2022) टी-20 ब्लास्टचा सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना ससेक्सनं 217 धावांचं लक्ष्य दिलं होतं. यादरम्यान यष्टीरक्षक फलंदाज फिलिपनं संघासाठी 43 चेंडूत 70 धावा केल्या. त्याच्या खेळीत 5 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता. प्रत्युत्तरात समरसेटच्या संघाला केवळ 169 धावापर्यंत मजल मारला आली. यादरम्यान मिल्सनं ससेक्ससाठी भेदक गोलंदाजी करत चार विकेट्स घेतल्या. 


टायमल मिल्सनं अफलातून झेल
सॉमरसेटच्या डावात टायमल्स मिल्सनं अफलातून झेल घेतला. समरसेटचा फलंदाज रिले रॉसोनं रोलिन्सचा चेंडूवर दिलस्कूप शॉट खेळला. पण काही अंतरावर उभ्या असलेल्या टायमल मिल्सनं चेंडूच्या दिशेनं हवेत उडी मारून अवघड झेल घेतला.


व्हिडिओ- 



आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघानं निराशाजनक कामगिरी करून दाखवली आहे. त्यानंतर अनेक दिग्गज खेळाडू मुंबईच्या संघाचं विश्लेषण करताना दिसले. दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानं कायरन पोलार्ड, मुरुगन अश्विन, टायमल मिल्स आणि जयदेव उनादकट यांच्यासाठी आयपीएलचा यंदाचा हंगाम अखेरचा ठरू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली होती. 


हे देखील वाचा-