IND vs SA T20: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला 9 जूनपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना दिल्लीत खेळला जाणार आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20  सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत माजी क्रिकेटपटू जहीर खान (Zaheer Khan) आणि आरपी सिंह यांचंही नाव आहे. तर, या यादीत भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनचं ​​नाव पहिल्या क्रमांकावर येते. अश्विन हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताकडून सर्वाधिक टी-20 विकेट घेणारा गोलंदाज आहे. 

दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 सामन्यात भारतीय गोलंदाजांची कामगिरी
दक्षिण आफ्रिकाविरुद्ध आर अश्विननं आतापर्यंत सहा टी-20 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं सर्वाधिक 10 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं सहा सामन्यात आठ विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत झहीर खान तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं तीन सामन्यात सहा विकेट घेतल्या आहेत. तर, हार्दिक पांड्या पाच विकेट्ससह चौथ्या स्थानावर आहे. भारताच्या सध्याच्या संघातही त्याचा समावेश आहे. आरपी सिंहनंही दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 मध्ये 5 विकेट घेतल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय गोलंदाज

क्रमांक भारतीय गोलंदाज विकेट्स 
1 रविचंद्र अश्विन 10
2 भुनवेश्वर कुमार 08
3 जहीर खान 06
4 हार्दिक पांड्या 05
5 आरपी सिंह 05

दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 मालिकेत युवा खेळाडूंना संधी
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. दरम्यान, आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केलेल्या युवा खेळाडूंना संघात संधी देण्यात आली आहे. ज्यात रवि बिश्नोई, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह आणि उमरान मलिक यांच्यासारख्या खेळाडूंचा समावेश आहे. 

हे देखील वाचा-