Smriti Mandhana injured : भारतीय महिला क्रिकेट संघ (Womens Team India) सध्या दक्षिण आफ्रिकेत आहे, जिथं आजपासून (10 फेब्रुवारी) ICC महिला T20 विश्वचषक सुरू होत आहे. भारतीय महिला संघाला (Womens Cricket Team) 12 फेब्रुवारीला पाकिस्तानी महिला संघाविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. याआधी टीम इंडियाची (Team India) उपकर्णधार स्मृती मंधाना (Smriti Mandhana) दुखापतीमुळे सामन्याबाहेर होऊ शकते. भारत सलामीचा सामना पाकिस्तानविरुद्ध (IND vs PAK) 12 फेब्रुवारी रोजी खेळणार आहे. दरम्यान विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला आपल्या मोहिमेची सुरुवात धमाकेदारपणे करायची आहे. अशा परिस्थितीत स्मृती मंधाना या सामन्यातून बाहेर राहिल्यास संघाच्या फलंदाजीवर मोठा दबाव निर्माण होऊ शकतो. मंधानाने 8 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सराव सामन्यातही भाग घेतला नव्हता. स्मृतीला ही दुखापत ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाविरुद्धच्या सराव सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान झाली होती.
याशिवाय भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) पाकिस्तानविरुद्धच्या (Pakistan Cricket) सामन्यात खेळण्याची शक्यता फारच कमी असल्याचे बोलले जात आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA) तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात हरमनप्रीतच्या खांद्याला दुखापत झाली होती, त्यानंतर ती अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकलेली नाही.
कशी आहे टीम इंडिया?
भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया, ऋचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवानी, पूजा वस्त्रकर, राजेश्वरी गायकवाड, राजेश्वरी गायकवाड.
T20 विश्वचषकात भारताचे सामने कधी-कधी होणार आहेत?
- 12 फेब्रुवारी: भारत विरुद्ध पाकिस्तान (केपटाऊन, संध्याकाळी 6.30)
- 15 फेब्रुवारी: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (केपटाऊन, संध्याकाळी 6.30 वाजता)
- 18 फेब्रुवारी: भारत विरुद्ध इंग्लंड (गेकेबेरा, संध्याकाळी 6.30 वाजता)
- 20 फेब्रुवारी: भारत विरुद्ध आयर्लंड (गेकेबेरा, संध्याकाळी 6.30 वाजता)
कधी, कुठे पाहाल विश्वचषकाचे सामना?
भारतीय महिला संघ पाकिस्तानविरुद्धच्या (India vs Pakistan) सामन्यानी विश्वचषकाची (WC 2023) सुरुवात करणार आहेत. हा सामना 12 फेब्रुवारीला केपटाऊनच्या न्यूलँड्स क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. दरमयान हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता सुरु होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर केले जाणार आहे. डिस्ने + हॉटस्टार अॅपवरही सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.
हे देखील वाचा-