(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs NZ : 4 डावात 3 शतकं! शुभमन गिल तुफान फॉर्मात, आकडेवारी पाहून हैराण व्हाल
IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिलने शानदार शतक झळकावलं. त्याने 78 चेंडूत 112 धावांची खेळी केली.
Shubhman Gill Record : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand)यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलनं (Shubhman Gill) शतक झळकावलं आहे. त्याने 78 चेंडूत 112 धावा केल्या. त्याच्या खेळीत एकूण 13 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 143.59 होता. विशेष म्हणजे शुभमननं मागील चार एकदिवसीय सामन्यांत तीन शतकं ठोकली आहे. आजचा हा एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर (Holkar Cricket Stadium, Indore) खेळवला जात आहे. मागील सामन्यातही गिल उत्कृष्ट लयीत दिसला होता, जिथे त्याने 53 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 40 धावांची खेळी केली होती.
वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या 108 धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने 20.1 षटकांत 2 गडी गमावून लक्ष्य गाठले. कमी लक्ष्यामुळे गिलला मोठी धावसंख्या करण्यात अपयश आलं. मालिकेतील पहिल्याच सामन्यात त्याने द्विशतक झळकावलं. त्या डावात त्याने 149 चेंडूत 208 धावा केल्या होत्या. गिलच्या खेळीत एकूण 19 चौकार आणि 9 षटकारांचा समावेश होता आणि आता पुन्हा एकदा त्याने या मालिकेत धडाकेबाज शतक झळकावलं आहे. यापूर्वी श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यातही त्याने शतक झळकावलं होते. त्या सामन्यात त्याने 97 चेंडूत 116 धावांची खेळी केली होती. अशाप्रकारे गिलने मागील 4 डावांत 3 शतकं झळकावली आहेत. याशिवाय त्याच्या शेवटच्या 10 डावांवर नजर टाकली तर त्याने 3 शतकं आणि 2 अर्धशतकं झळकावली आहेत.
रोहित शर्माने शतकांचा दुष्काळही संपवला
या सामन्यात रोहित शर्मानेही आपल्या शतकांचा दुष्काळ संपवला. त्याने 16 महिन्यांनंतर शतक झळकावलं. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने 85 चेंडूत 101 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत एकूण 9 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता.
शुभमन गिलची मागील 10 डावांतील धावसंख्या
78 चेंडूत 112 धावा.
149 चेंडूत 208 धावा.
97 चेंडूत 116 धावा.
12 चेंडूत 21 धावा.
60 चेंडूत 70 धावा.
22 चेंडूत 13 धावा.
42 चेंडूत 45 धावा.
65 चेंडूत 50 धावा.
57 चेंडूत 49 धावा.
26 चेंडूत 28 धावा.
भारतीय संघ नंबर वन वनडे संघ बनण्यासाठी सज्ज
सध्या भारतीय संघ 113 रेटिंग आणि 4847 गुणांसह आयसीसी वनडे क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. आता सुरु तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करून भारतीय संघ एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान होऊ शकतो.
हे देेखील वाचा-