Shreyas Iyer Fifty IND vs ENG 1st ODI Match : 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी श्रेयस अय्यरने चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे संकेत दिले आहेत. नागपूरमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले. त्याने अवघ्या 30 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. हे अय्यरचे एकदिवसीय सामन्यांमधील दुसरे सर्वात जलद अर्धशतक आहे. यापूर्वी 2019 मध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध 28 चेंडूत अर्धशतक झळकावले होते.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधार फक्त 2 धावा काढून बाद झाला, तेव्हा श्रेयस अय्यर फलंदाजीला आला. रोहित बाद झाल्यानंतर टीम इंडियाने फक्त 19 धावांत दोन विकेट गमावल्या. येथून श्रेयस अय्यरने इंग्लंडच्या गोलंदाजांवर चांगलाच समाचार घेतला. त्याने वेगवान धावा करत, फक्त 30 चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. त्याचा डाव 59 धावांवर संपला. त्याने 36 चेंडूत 59 धावांच्या खेळीत 9 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याने संपूर्ण डावात 11 चौकार मारले आणि सुमारे 164 च्या तुफानी स्ट्राईक रेटने फलंदाजी केली.
भारताकडून एकदिवसीय सामन्यातील सर्वात वेगवान अर्धशतक
भारतासाठी सर्वात जलद अर्धशतक करणारा खेळाडू अजित आगरकर आहे, ज्याने 2000 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध फक्त 21 चेंडूत अर्धशतक केले होते. अजित आगरकर हे टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता देखील आहेत. एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद अर्धशतक करणारा दुसरा भारतीय फलंदाज कपिल देव आहे, ज्याने 1983 मध्ये 22 चेंडूत अर्धशतक केले होते. राहुल द्रविड आणि युवराज सिंग यांनीही एकदिवसीय सामन्यांमध्ये 22 चेंडूत अर्धशतके झळकावली आहेत. या यादीत सूर्यकुमार यादवचे नावही समाविष्ट आहे, ज्याने 24 चेंडूत एकदिवसीय अर्धशतक केले आहे.
हे ही वाचा :