Rohit Sharma IND vs ENG 1st ODI : कसोटी, रणजीमध्ये अपयशी ठरल्यानंतर आता रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. पण, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात फॉरमॅट बदलला, परंतु रोहितची कामगिरी नाही. पहिल्या एकदिवसीय सामन्यात कर्णधाराचा खेळ फक्त 7 चेंडूत संपला. हिटमॅन म्हणून ओळखला जाणारा रोहित फक्त 2 धावा करून आऊट झाला. नागपूरमध्येही खराब फॉर्मने रोहितला सोडले नाही.

रोहित पुन्हा एकदा ठरला अपयशी 

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माकडून सर्वांनाच मोठी खेळी अपेक्षित होती. नागपूरच्या मैदानावर हिटमनचा रेकॉर्ड चांगला होता आणि तो या मैदानाशी चांगला परिचित होता. पण, भारतीय कर्णधाराने पुन्हा एकदा लाखो भारतीय चाहत्यांचे मन मोडले. 7 चेंडूंचा सामना केल्यानंतर रोहित फक्त 2 धावा करून बाद झाला. शाकिब महमूदच्या चेंडूवर मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात तो कॅच आऊट झाला. ज्याचा व्हिडिओ आता सोशल माडियावर व्हायरल होत आहे.

16 डावांमध्ये फक्त एक अर्धशतक

रोहित शर्माने गेल्या 16 आंतरराष्ट्रीय डावांमध्ये फक्त एकच अर्धशतक झळकावले आहे. एवढेच नाही तर गेल्या 16 डावांमध्ये 11 वेळा हिटमॅनला दुहेरी आकडा ओलांडण्यात अपयश आले आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहितला वाईट कामगिरी करावी लागली होती. पण, त्याच्या आवडत्या एकदिवसीय स्वरूपात तो त्याचा हरवलेला फॉर्म शोधू शकेल असा विश्वास होता. पण तसे झाले नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी रोहितच्या सतत घसरत्या फॉर्ममुळे संघ व्यवस्थापनाचा ताण आणखी वाढला आहे.

हे ही वाचा -

Champions Trophy Australia : चॅम्पियन ट्रॉफीपूर्वीच कांगारू उध्वस्त; एक, दोन नाही तर कर्णधारासह 5 धक्के, टीम इंडियाचा चॅम्पियन्स होण्याचा मार्ग मोकळा?

पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध शिवराज राक्षे विशेष कुस्ती सामना घेणार, महाराष्ट्र केसरीतील वाद संपवण्यासाठी चंद्रहार पाटलांचा पुढाकार