Duleep Trophy 2024 Shreyas Iyer fails : एकीकडे भारतीय क्रिकेट संघ बांगलादेशविरुद्ध चेन्नईत पहिला कसोटी सामना खेळत आहे. दुसरीकडे अनंतपुरातही दुलीप ट्रॉफीचे सामने होत आहेत. यामध्ये पण अनेक स्टार खेळाडू खेळत आहेत. श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, तिळक वर्मा, सूर्यकुमार यादव आणि आवेश खान असे भारताकडून खेळलेले खेळाडू दुलीप ट्रॉफीमध्ये खेळत आहेत. मात्र, या स्पर्धेत स्टार फलंदाज श्रेयस अय्यरची कामगिरी चांगली राहिली झाली नाही. तो पुन्हा एकदा फ्लॉप ठरला.
दुलीप ट्रॉफी 2024 चा पाचवा सामना इंडिया बी आणि इंडिया डी यांच्यात अनंतपूर येथे खेळला जात आहे. या दरम्यान इंडिया डी संघ प्रथम फलंदाजी करत आहे. संघाची सुरुवात चांगली झाली. देवदत्त पडिक्कल आणि श्रीकर भरत या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 105 धावांची शानदार भागीदारी केली. यादरम्यान पडिक्कलने 95 चेंडूंत 8 चौकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. तर श्रीकर भरतने 105 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 52 धावांची खेळी केली. रिकी भुईनेही मधल्या फळीत चांगली फलंदाजी केली.
श्रेयस अय्यर खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये
मात्र, ज्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या, तो कर्णधार श्रेयस अय्यर यावेळीही फ्लॉप ठरला. श्रेयस अय्यरने 5 चेंडूंचा सामना केला आणि खातेही न उघडता बाद झाला. यावरून तो किती वाईट फॉर्ममध्ये आहे हे दिसून येते. युवा गोलंदाज राहुल चहरने त्याला आपला शिकार बनवले. श्रेयस अय्यरच्या सततच्या खराब कामगिरीमुळे त्याच्या टीम इंडियात पुनरागमनाच्या आशांनाही मोठा फटका बसला आहे.
श्रेयस अय्यर दुलीप ट्रॉफीच्या आतापर्यंतच्या तिन्ही फेऱ्यांमध्ये फ्लॉप ठरला आहे. त्याच्याकडून एकही मोठी खेळी दिसली नाही. एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतण्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्या पाच डावांमध्ये अय्यरने 9, 54, 0, 41, 0 धावा केल्या आहेत. आता त्याच्या खराब कामगिरीवर चाहते संतापले आहेत.
नुकतेच एक विधान समोर आले आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की, भारतीय निवड समिती त्याच्यावर खूश नाहीत. या खराब कामगिरीनंतर त्याचे पुनरागमन आता आणखी कठीण झाले आहे.
हे ही वाचा -
Test Live : पंतला महागात पडली ही चूक, खेळपट्टीवर सेट झाल्यानंतर गमावली विकेट