India vs Bangladesh 1st Test Live : टीम इंडिया आणि बांगलादेश क्रिकेट संघ यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय योग्य ठरला, कारण भारताने 10 षटकात 34 धावांवर 3 विकेट गमावल्या.




भारताचा डाव फसला पण युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने अर्धशतक पूर्ण करून भारतीय डाव पुन्हा रुळावर आणला. यशस्वीने 56 धावांची शानदार खेळी केली आणि काही विक्रमही केले. जैस्वाल आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 ​​च्या वर्तुळात सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाज बनला आहे. असे करून जैस्वाल यांनी इतिहास रचला आहे.


यशस्वी जैस्वालने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 ​​मध्ये आतापर्यंत 144 हून अधिक चौकार मारले आहेत. असे करून जैस्वालने यावेळी जो रूटला मागे टाकले आहे. जो रूटने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 ​​च्या वर्तुळात आतापर्यंत 143 चौकार मारले आहेत. याशिवाय बेन डकेटने आतापर्यंत 140 चौकार लगावले आहेत.




वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 ​​मध्ये सर्वाधिक चौकार असलेले फलंदाज (Most boundaries in WTC cycle 2023-25)


144* - यशस्वी जैस्वाल
143 - जो रूट
140 - बेन डकेट
133 - जॅक क्राउली


पहिल्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, पहिल्या दिवशी चहापानापर्यंत भारताने सहा गडी गमावून 176 धावा केल्या होत्या. पहिल्या सत्रात भारताने 23 षटकांत 3 गडी गमावून 88 धावा केल्या होत्या. दुसऱ्या सत्रात भारताने 25 षटकात 88 धावा केल्या आणि तीन विकेट गमावल्या. सध्या रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा क्रीजवर आहेत. 


जडेजा 17 चेंडूत 7 धावा करून नाबाद असून अश्विन 19 चेंडूत 21 धावा करून नाबाद आहे. पहिल्या सत्रात भारताने रोहित शर्मा (6), शुभमन गिल (0) आणि विराट कोहली (6) यांच्या विकेट्स गमावल्या. त्याचवेळी दुसऱ्या सत्रात भारताने ऋषभ पंत (39), यशस्वी जैस्वाल (56) आणि केएल राहुल (16) यांच्या विकेट्स गमावल्या. बांगलादेशकडून हसन महमूदने चार बळी घेतले. तर नाहिद राणा आणि मेहदी हसन मिराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.


हे ही वाचा -


IND vs BAN 1st Test Live : पंतला महागात पडली ही चूक, खेळपट्टीवर सेट झाल्यानंतर गमावली विकेट


IND vs BAN 1st Test Live : शुभमन गिल पुन्हा शून्यावर आऊट, नेटकरी संतापले, म्हणाले, 'आगरकर-जय शाहाच्या सेटींगमुळे संघात...'


IND vs BAN 1st Test Live : "भाई मुझे क्यो मार रहे हो?" ऋषभ पंत-लिटन दासची भर मैदानात तू-तू मैं-मैं, VIDEO तुफान व्हायरल...