Shreyas Iyer, Ishan Kishan BCCI contracts : स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि शानदार यष्टीरक्षक ईशान किशन (Ishan Kishan) यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय, BCCI) 28 फेब्रुवारी रोजी मोठा धक्का दिला. या दोघांनाही बीसीसीआयने (BCCI) वार्षिक करारातून वगळलं. त्यानंतर अय्यर आणि किशन याचं टीम इंडियातील रस्ते बंद झाल्याची चर्चा सुरु झाली. पण या दोघांचे टीम इंडियाचे दरवाजे बंद झालेले नाहीत. टीम इंडियात परत येण्यासाठी या दोघांना संधी असतात. 


ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी आगामी आयपीएल स्पर्धेत शानदार कामगिरी केली, तर टी20 विश्वचषकासाठी विचार करण्यात येईल. 28 फेब्रुवारी रोजी बीसीसीआयनं ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्यावर कारवाई करत करारातून वगळलं. देशांतर्गत क्रिकेटमध्ये न खेळल्यामुळे यो दोन्ही खेळाडूंवर कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही युवा खेळाडूंकडे पुन्हा एकदा टीम इंडियात परतण्याची संधी असेल.


केंद्रीय करारातून वगळल्यानंतर निवड समिती त्या खेळाडूंचा विचार करत नाही, असं नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केल्यास निवड समिती त्या खेळाडूचा विचार करते. पण या परिस्थितीमध्ये खेळाडूंना वार्षिक पराग दिला जात नाही. त्या खेळाडूंना सामन्यानुसार पगार दिला जातो.


देशांतर्गत क्रिकेटकडे दुर्लक्ष -


देशांतर्गत क्रिकेट न खेळल्यामुळे ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना केंद्रीय करारातून बीसीसीयानं वगळलं.  टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड आणि बीसीसीआय सचिव जय शाह यांनी खेळाडूंना सल्ला दिला होता. आंतरराष्ट्रीय सामने खेळत नसेल तर देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला होता. श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांनी जय शाह आणि राहुल द्रविड यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच बीसीसीआयने त्यांना धक्का दिला.  


केंद्रीय करारात परत कसे येतील - 


देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केल्यास ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांची टीम इंडियात पुन्हा वर्णी लागू शकते. टीम इंडियात कमबॅक झाल्यानंतर या वर्षात अय्यर आणि किशन यांना तीन कसोटी, 8 वनजे अथवा 10 टी20 सामने खेळल्यास पुन्हा वार्षिक करारात कमबॅक होईल. पण अशा स्थितीमध्ये दोघांना सी ग्रेडमध्ये स्थान मिळेल.


इतर महत्वाच्या बातम्या