Shikhar Dhawan-Ayesha Divorce : भारतीय संघाचा सलामी फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) याला दिल्ली फॅमिली कोर्टाने दिलासा दिला आहे. दिल्लीतील कौटुंबिक न्यायालयाने शिखर धवनचा घटस्फोट मंजूर केला आहे. शिखर धवन आणि आयशा यांचा घटस्फोटाला दिल्ली कोर्टाने मंजुरी दिली आहे. नऊ वर्षांच्या संसारानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.  


शिखर धवन आणि आयशा मुखर्जी नऊ वर्षापूर्वी  2012 साली विवाहबंधनात अडकले होते. धवन आणि आयशा यांना एक मुलगा असून त्याचे नाव जोरावर आहे. आयशा शिखरपेक्षा दहा वर्षाने मोठी आहे. आयशाचा हा शिखर धवनशी दुसरा विवाह होता. आयशाला पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत. त्यानंतर 2014 साली आयशाने जोरावरला जन्म दिला. धवन आणि आयशाच्या लग्नावर अनेक प्रश्न उपस्थित राहिले होते. दरम्यान, 2020 साली शिखर आणि आयशाच्या नात्यामध्ये तणाव असल्याच्या बातम्या समोर आल्या आहे. त्यानंतर दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले. तसेच आयशाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउऊंटवरून शिखरचे सगळे फोटो काढले.  


पत्नी आयशाने शिखर धवन याला मानसिक त्रास दिल्याचे न्यायालयाने मान्य केले. बार बेंचच्या रिपोर्ट्सनुसार, शिखरची पत्नी आयशा हिने क्रिकेटरला त्याच्या एकुलत्या एका मुलापासून अनेक वर्षे वेगळे राहण्यास भाग पाडून मानसिक त्रास दिला.घटस्फोटाच्या याचिकेत शिखरने पत्नीवर केलेले सर्व आरोप न्यायालयाने मान्य केले. धवनच्या पत्नीने एकतर या आरोपांना विरोध केला नाही किंवा स्वत:चा बचाव करण्यात अपयशी ठरल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
 
मुलाच्या कस्टडीसंदर्भात निर्णय नाही - 


आयशाने आपल्याला मानसिक क्रूरतेची शिकार बनवल्याचे 37 वर्षीय शिखर धवनने आपल्या याचिकेत म्हटले होते. न्यायालयाने धवन दाम्पत्याच्या मुलाच्या ताब्यात अथवा कस्टडीसंदर्भात सध्या कोणताही आदेश देण्यास नकार दिला. न्यायालयाने धवनला वाजवी कालावधीसाठी भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आपल्या मुलाशी भेटण्याचा आणि व्हिडिओ कॉल करण्याचा अधिकारही दिला.


आयशाची पोस्ट चर्चेत


शिखर धवनसोबत वेगळं झाल्यानंतर आयशा हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. ती पोस्ट चर्चेत होती. पहिल्यांदा घटस्फोट घेतल्यावर मी खूप घाबरलो होतो. मला असे वाटले की मी अयशस्वी झाले आहे आणि त्यावेळी वाटले की मी  खूप चुकीचे करत होते. मला वाटले की मी सर्वांना निराश केले आहे आणि मी स्वार्थी देखील आहे. मला वाटले की मी माझ्या पालकांना निराश करत आहे. मला वाटले की, मी माझ्या मुलांचा अपमान करत आहे आणि काही प्रमाणात मला असे वाटले की मी देवाचाही अपमान केला आहे. घटस्फोट हा एक अतिशय घाणेरडा शब्द होता. पण हे माझ्यासोबत पुन्हा घडले. ते भयंकर होते. एकदा घटस्फोट घेतल्यानंतर, दुसऱ्यांदा मला असे वाटले की माझ्याकडे बरेच काही आहे. मला बरेच काही सिद्ध करायचे होते. म्हणून जेव्हा माझे दुसरे लग्न मोडले तेव्हा ते खूप वाईट होते. मी पहिल्यांदा ज्या भावनांमधून गेलो होतो ते पुन्हा परत आले. शंभर पट भीती, अपयश आणि निराशा... ' असे आयशाने पोस्टमध्ये म्हटले होते.