ODI World Cup, ENG vs NZ : विश्वचषकाच्या महाकुंभाला काही तासांत सुरुवात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअवर गतविजेता इंग्लंड आणि उप विजेता न्यूझीलंड यांच्यामध्ये सलामीचा सामना रंगणार आहे. पण या सामन्याला सुरुवात होण्याच्या काही तास आधीच इंग्लंडला जबरी धक्का बसला आहे. इंग्लंडचा मॅचविनर ऑलराऊंडर बेन स्टोक्स पहिल्या सामन्याला मुकणार आहे. दुखापतीमुळे बेन स्टोक्स पहिल्या सामन्याला उपलबद्ध नसेल. 2019 च्या विश्वचषकात बेन स्टोक्स याने दमदार कामगिरी केली होती, त्यामुळे हा इंग्लंडसाठी मोठा धक्का मानला जातोय.
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने बेन स्टोक्स अनफिट असल्याचे सांगितले. सामन्याआधी होणाऱ्या फिटनेस चाचणीनंतर बेन स्टोक्सबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. बांगलादेशविरोधातील सराव सामन्यावेळी बेन स्टोक्स दुखापतग्रस्त झाला होता. इंग्लंडच्या आघाडीच्या खेळाडूपैकी स्टोक्स एक आहे. विश्वचषकासाठी स्टोक्सने वनडेतील निवृत्ती मागे घेतली होती.
न्यूझीलंडलाही धक्का
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन पहिल्या सामन्याला उपलब्ध नसेल. तर इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सही या सामन्यात खेळणार नाही. दुखापतीमुळे दोन्ही संघाचे आघाडीचे खेळाडू पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नाहीत. याचा फटका दोन्ही संघाला बसू शकतो. 2019 च्या वर्ल्डकप फायनलमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर चौकार जास्त असणाऱ्या इंगलंडला विजयी घोषीत केले होते. त्यामुळे या पराभवाचा वचपा काढण्यासाठी किवी मैदानात उतरतील.
सराव सामन्यात इंग्लंडचा विजय -
गतविजेत्या इंग्लंडला दोन सराव सामने खेळायचे होते, पण भारताविरोधातील सामना पावसामुळे रद्द झाला. तर दुसऱ्या सराव सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला. बांगलादेशविरोधात इंग्लंडने दमदार कामगिरी केली. हा सामनाही पावसाने प्रभावित झाला, पण डकवर्थ लुईस नियमानंतर इंग्लंडने 77 चेंडू राखून सामना जिंकला. बांगलादेशने प्रथम फंलदाजी करताना 37 षटकात सहा विकेटच्या मोबदल्यात 188 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल इंग्लंडने 77 चेंडू शिल्लक ठेवून हे लक्ष्य पार केले.
दोन्ही संघाचे शिलेदार -
न्यूझीलंड : केन विलियमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चैपमैन, डेवोन कॉनवे, लॉकी फर्ग्यूसन, मैट हेनरी, टॉम लॅथम, डेरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिच सेंटनर, ईश सोधी, टिम साउदी, विल यंग
इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार), मोइन अली, गस एटकिंसन, जॉनी बेयरस्टो, सैम कुरेन, लियाम लिविंगस्टोन, डेविड मालन, आदिल राशिद, जो रूट, हैरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टॉपले, डेविड विली, मार्क वुड, क्रिस वोक्स