ODI World Cup, ENG vs NZ : अवघ्या काही तासांमध्ये वनडे विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे. गतविजेता इंग्लंड आणि उप विजेता न्यूझीलंड यांच्यामध्ये सलामीचा सामना होणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर सलामीची लढत होईल. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन पहिल्या सामन्याला उपलब्ध नसेल. तर इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सही या सामन्यात खेळणार नाही. दुखापतीमुळे दोन्ही संघाचे आघाडीचे खेळाडू पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नाहीत. याचा फटका दोन्ही संघाला बसू शकतो. 2019 च्या वर्ल्डकप फायनलमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर चौकार जास्त असणाऱ्या इंगलंडला विजयी घोषीत केले होते. त्यामुळे या पराभवाचा वचपा काढण्यासाठी किवी मैदानात उतरतील. 


नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी कशी आहे ?


जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडिअवर एकूण 11 खेळपट्टया आहेत. लाल आणि काळ्या मातीने ही खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळते.  काही खेळपट्टीवर धावा जास्त होतात. सलामीच्या सामन्यात जी खेळपट्टी वापरण्यात येईल, त्यावर जास्त धावा निघतील. इंग्लंडकडे विस्फोटक फंलदाज आहेत, न्यूझीलंडही कमी नाही. त्यामुळे सामना रंगतदार होईल.


हेड टू हेड - 


वनडे क्रिकेटमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आतापर्यंत 95 सामने झाले आहेत. त्यामध्ये इंग्लंडने 45 तर न्यूझीलंडने 44 सामन्यात विजय मिळवला आहे. चार सामन्याचा निकाल लागला नाही, दोन सामने बरोबरीत सुटले. इंग्लंडच्या विजयाची टक्केवारी 47.36 इतकी आहे. तर किवीची टक्केवारी 46.31 इतकी आहे. म्हणजेच इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना रंगतदार होणार आहे. 


विश्वचषकात हेड टू हेड - 


वनडे वर्ल्ड कप (ODI World Cup) च्या इतिहासात न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यामध्ये (ENG vs NZ Head to Head in World Cup) आतापर्यंत 10 सामने झाले आहेत. यामध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी पाच पाच सामने जिंकले आहेत.  भारतामध्ये दोन्ही संघ फक्त एक वेळा आमने सामने आले आहेत, त्यामध्ये इंग्लंड संघाने बाजी मारली आहे.


दोन्ही संघाचे शिलेदार - 


न्यूझीलंड : केन विलियमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चैपमैन, डेवोन कॉनवे, लॉकी फर्ग्यूसन, मैट हेनरी, टॉम लॅथम, डेरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिच सेंटनर, ईश सोधी, टिम साउदी, विल यंग 


इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार), मोइन अली, गस एटकिंसन, जॉनी बेयरस्टो, सैम कुरेन, लियाम लिविंगस्टोन, डेविड मालन, आदिल राशिद, जो रूट, हैरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टॉपले, डेविड विली, मार्क वुड, क्रिस वोक्स