Shardul Thakur Wedding : शार्दुल ठाकूर अडकला लग्नाच्या बेडीत, मित्ताली परुळकरसोबत बांधली लगिनगाठ
Shardul Thakur Wedding : भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर आज लग्नाच्या बेडीत अडकला आहे. प्रेयसी मित्ताली परुळकरसोबत त्याने लगिनगाठ बांधली.
Shardul Thakur Wedding : भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर आज लग्नाच्या बेडीत अडकला आहे. प्रेयसी मित्ताली परुळकरसोबत त्याने लगिनगाठ बांधली. केएल राहुल आणि अक्षर पटेल यांच्यानंतर यंदा लग्न करणारा शार्दुल तिसरा भारतीय क्रिकेटर आहे. शार्दुलच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नेटकरी शार्दुलला लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत.
शार्दुल-मिताली यांचं लग्न मोठ्या धूमधडाक्यात पार पडले. लग्नाआधी हळदी आणि संगिताचा कार्यक्रम पार पडला होता. याचे काही फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, श्रेयस अय्यर यांनीही शार्दूलच्या लग्नाला उपस्थिती दर्शवली होती. त्याशिवाय युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा, अभिषेक नायर आणि मुंबई संघातील काही खेळाडूंनीही लग्नाला उपस्थिती दर्शवली होती.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
Congratulations Shardul Thakur & Mittali Parulkar.
— Johns. (@CricCrazyJohns) February 27, 2023
Wishing both a happy married life. pic.twitter.com/2m4e8cnhQH
शार्दुल ठाकूरने आतापर्यंत आठ कसोटी, 34 वनडे आणि 25 टी20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 27 तर वनडेत 50 आणि टी 20 मध्ये 33 विकेट घेतल्या आहेत. शार्दूलने गोलंदाजीसोबत फलंदाजीतही योगदान दिलेय. आगामी आयपीएलमध्ये तो कोलकाता संघात खेळताना दिसणार आहे.
कोण आहे शार्दूलची पत्नी?
शार्दुलची होणारी पत्नी मिताली परुळकर ही एक बिजिनेस वुमन आहे. तर पालघरचा असणारा शार्दूल आधी आयपीएलमधून सर्वांसमोर आला होता. सुरुवातीला काही संघातून खेळण्यानंतर धोनीच्या कॅप्टन्सीखाली चेन्नई सुपरकिंगमध्ये शार्दूलचा खेळ खऱ्या अर्थाने बहरला. त्यानंतर भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर तिथेही त्याने आपली खास जागा बनवली. त्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने वॉशिंग्टन सुंदर सोबत मिळून ठोकलेलं एक अर्धशतक भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरलं होतं. त्यामुळेच भारत मालिकाही जिंकला होता. त्यानंतर मर्यादीत षटकातही चमकदार कामगिरी करणारा शार्दूल एक महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून भारतीय संघात आहे. संघाला विकेटची गरज असताना विकेट घेणारा आणि अडचणीच्या काळात फलंदाजी सांभळणारा अशी शार्दूलची ओळख आहे. शार्दूलने तिनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पण केलं आहे. दरम्यान, 2021 नोव्हेंबरमध्ये शार्दूलचा साखरपुडा झाला असून त्याचा व्हिडीओ बराच व्हायरल झाला होता.
आणखी वाचा :
Viral Video: शार्दूलच्या लग्नाची धामधूम, श्रेयस अय्यर गातोय गाणं अन् शार्दूल करतोय डान्स, पाहा VIDEO