Legends League Cricket Matches : लेजेंड्स लीग क्रिकेट (Legends League Cricket) स्पर्धेचा नवा हंगाम लवकरच खेळवला जाणार आहे. यावेळी इंडियन महाराजा (India Maharaja) आणि वर्ल्ड जायंट्स (World Giants) हे दोन्ही संघ आमने-सामने भिडणार आहे. या सामन्यात हर्शल गिब्स (Herschelle Gibbs) आणि सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) हे दोघे खेळाडू वर्ल्ड जायंट्स संघातून खेळताना दिसणार नाहीत. हर्शल गिब्स आणि सनथ जयसूर्याच्या जागी शेन वॉटसन (Shane Watson) आणि डॅनियल व्हेटोरी (Daniel Vettori) हे दोघे खेळणार आहेत.
या स्पर्धेतील पहिला सामना भारतातील ऐतिहासिक स्टेडियम कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर 16 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. महत्वाचं म्हणजे, इंडिया महाराजा संघाचं नेतृत्व भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली करणार आहे. यावर्षी भारतीय संघाचं नाव इंडिया महाराज ठेवण्यात आलंय. तर, वर्ल्ड संघाचं नाव वर्ल्ड जाएंट्स असं आहे. सौरव गांगुली दिर्घकाळानंतर भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणार आहे. लीजेंड्स क्रिकेट लीगमध्ये वर्ल्ड टीमकडून 10 देशातील खेळाडू सहभागी होणार आहे. ज्यात इंग्लंड, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, बांग्लादेश, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आणि अफगाणिस्तानच्या खेळाडूंच्या समावेश आहे.
इंडिया महाराजा संघ:
सौरव गांगुली (कर्णधार), वीरेंद्र सहवाग, मोहम्मद कैफ, यूसुफ पठान, एस बद्रीनाथ, इरफान पठान, पार्थिव पटेल, स्टुअर्ट बिन्नी, एस श्रीसंत, हरभजन सिंह, नमन ओझा, अशोक डिंडा, प्रज्ञान ओझा, अजय जडेजा, आरपी सिंह, जोगिंदर शर्मा.
वर्ल्ड जायंट्स:
इयॉन मॉर्गन (कर्णधार), लेन्डले सिमन्स, जॅक कालिस, शेन वॉटसन, मॅट प्रायर, नाथन मैक्क्युलम, जोंटी रोड्स, मुथय्या मुरलीधरन, डेल स्टेन, हॅमिल्टन मसाकदजा, डॅनियल व्हेटोरी, मशरफे मुर्तजा, असगर अफगान, मिचेल जॉनसन, ब्रेट ली, केविन ओब्रायन, दिनेश रामदीन.
हे देखील वाचा-