Asia Cup :  आशिया खंडातील देशांसाठी विश्वचषकानंतर सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा म्हणजे आशिया कप (Asia Cup). यंदाच्या आशिया कप (Asia Cup 2022) साठीचं वेळापत्रक काही दिवसांपूर्वीच जाहीर झालं असून 27 ऑगस्टपासून सामन्यांना सुरुवात होणार आहे. दरम्यान या भव्य क्रिकेट स्पर्धेत सर्वात यशस्वी संघ म्हटलं तर भारत (Team India) हा असून भारताने तब्बल 7 वेळा विजेतेपद मिळवलं आहे. 1984, 1988, 1990/91, 1995, 2010, 2016 आणि 2018 साली भारताने चषक जिंकला आहे. 

यावेळी पाच वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्त्वाखाली भारताने चषक जिंकला असून यामध्ये सर्वात यशस्वी कर्णधार मोहम्मह अझराउद्दीन आणि एमएस धोनी हे आहेत. या दोघांनी देखील प्रत्येकी दोन वेळा भारताला कप जिंकवून दिला आहे. याशिवाय सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर आणि रोहित शर्मा यांनीही एक-एकदा भारताला आशिया चषक मिळवून दिला आहे. तर नेमकी वर्षनिहाय यादी कशी आहे ते पाहूया...

वर्ष कर्णधार 
1984 सुनील गावस्कर
1988 दिलीप वेंगसरकर
1990/91 मोहम्मह अझराउद्दीन 
1995 मोहम्मह अझराउद्दीन 
2010 एमएस धोनी
2016 एमएस धोनी
2018 रोहित शर्मा

कसं आहे यंदाचं वेळापत्रक?

यंदा आशिया कपमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान हे पाच देश एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. यावेळी भारताचा स्पर्धेतील पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने युएईमध्ये होणार असून दुबई, शारजाह या मैदानात सामने रंगतील. 11 सप्टेंबर रोजी अंति सामना पार पडणार असून नेमकं वेळापत्रक कसं आहे पाहूया...

सामना दिवस दिनांक संघ ग्रुप  ठिकाण 
1 शनिवार 27 ऑगस्ट अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका बी दुबई
2 रविवार 28 ऑगस्ट भारत विरुद्ध पाकिस्तान दुबई
3 मंगळवार 30 ऑगस्ट बांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान  बी शारजाह
4 बुधवार 31 ऑगस्ट भारत विरुद्ध पात्र संघ दुबई
5 गुरुवार 1 सप्टेंबर श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश  बी दुबई
6 शुक्रवार 2 सप्टेंबर पाकिस्तान विरुद्ध पात्र संघ शारजाह
7 शनिवार 3 सप्टेंबर ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 शारजाह
8 रविवार 4 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 सुपर 4 दुबई
9 मंगळवार 6 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 1 सुपर 4 दुबई
10 बुधवार 7 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 2 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 दुबई
11 गुरुवार 8 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 दुबई
12 शुक्रवार 9 सप्टेंबर ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 सुपर 4 दुबई
13 रविवार 11 सप्टेंबर सुपर 4 पात्र 1 विरुद्ध सुपर 4 पात्र 2 सुपर 4 दुबई

हे देखील वाचा-