IND vs BAN Shakib Al Hasan : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना कानपूरमध्ये खेळवला जात आहे. या सामन्याच्या एक दिवस आधी बांगलादेशचा महान अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. शाकिबने शेवटचा कसोटी सामना मीरपूर येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्याची इच्छा व्यक्त केली. पण बांगलादेशमध्ये धोका असल्यामुळे सुरक्षेबाबत खुद्द शाकिबने चिंता व्यक्त केली आहे. याबाबत त्याने बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडे सुरक्षेची मागणीही केली होती, मात्र बोर्डाने त्याला सुरक्षा देण्यास नकार दिला आहे.
शाकिबने सुरक्षेबाबत व्यक्त केली चिंता
खरंतर, काही महिन्यांपूर्वी बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार पडले, त्यानंतर लष्कराने बांगलादेशचा ताबा घेतला. शेख हसीना सरकारमध्ये खासदार होत्या. याशिवाय बांगलादेशात उसळलेल्या दंगलीत एका तरुणाची हत्या केल्याचाही आरोप शाकिबवर आहे. शाकिबला बांगलादेश सोडून परदेशात शिफ्ट व्हायचे आहे.
आपल्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत शाकिब म्हणतो की, मी बांगलादेशचा नागरिक आहे, त्यामुळे मला बांगलादेशात परत जाण्यास कोणतीही अडचण येऊ नये. पण बांगलादेशातील सुरक्षितता ही माझी चिंता आहे. माझे जवळचे मित्र आणि कुटुंबीय काळजीत आहेत. मला आशा आहे की गोष्टी चांगल्या होत आहेत. यावर काहीतरी तोडगा निघायला हवा.
बीसीबीने सुरक्षा देण्यास दिला नकार
दुसरीकडे बांगलादेश क्रिकेट बोर्डाने शाकिबला सुरक्षा देण्यास नकार दिला आहे. बीसीबीचे अध्यक्ष फारूख म्हणतात की, शाकिबची सुरक्षा बोर्डाच्या हातात नाही. मंडळ कोणत्याही व्यक्तीला खाजगी सुरक्षा देऊ शकत नाही. त्यांनी याबाबत निर्णय घ्यावा. BCB ही पोलीस किंवा RAB सारखी सुरक्षा संस्था नाही. याबाबत आम्ही कोणाशीही बोललो नाही. त्याची केस कोर्टात प्रलंबित असल्याने आम्ही त्यावर काहीही करू शकत नाही.
कानपूर कसोटी शाकिबचा शेवटचा सामना?
शाकिब अल हसनला बांगलादेशमध्ये सुरक्षा मिळेल तेव्हाच तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका खेळू शकेल. अन्यथा कानपूर कसोटी सामना त्याच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरेल.
हे ही वाचा -