India vs Bangladesh 2nd Test Live Score : भारत आणि बांगलादेश यांच्यात दुसरी कसोटी कानपूरमध्ये खेळली जात आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडिया 1-0 ने पुढे आहे. भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.


भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहितने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. म्हणजे कुलदीप किंवा अक्षर या दोघांनाही संधी मिळाली नाही. जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज या तीन वेगवान गोलंदाजांसह भारतीय संघ मैदानात उतरला आहे. तर अश्विन आणि जडेजा फिरकीपटूंची जबाबदारी सांभाळतील. 


बांगलादेशचा कर्णधार नजमुलने प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले आहेत. वेगवान गोलंदाज तस्किन अहमद आणि नाहिद राणा बाहेर गेल्यामुळे तैजुल इस्लाम आणि खालिद अहमद यांना प्लेइंग-11 मध्ये संधी मिळाली आहे.  


टीम इंडियाची प्लेइंग-11 : यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.


बांगलादेश संघाची प्लेइंग-11 : शादमान इस्लाम, झाकीर हसन, नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालिद अहमद.


Accuweather नुसार, शुक्रवारी कानपूरमध्ये सुमारे 96 टक्के पाऊस पडू शकतो. अशाप्रकारे कानपूर कसोटीचा पहिला दिवस पावसाने वाया जाण्याची शक्यता आहे. तर कानपूरमध्ये दर तासाला हवामान कसे असेल ते जाणून घेऊया.....


शुक्रवारी कानपूर मधील हवामान



  • सकाळी 09:00 पाऊस - 40 टक्के 

  • सकाळी 10:00 पाऊस - 58 टक्के

  • सकाळी 11:00 पाऊस 64 टक्के

  • दुपारी 12:00 पाऊस - 49 टक्के 

  • दुपारी 1:00 पाऊस  - 59 टक्के 

  • दुपारी 2:00 पाऊस - 49 टक्के 

  • दुपारी 3:00 पाऊस - 49टक्के 

  • दुपारी 4:00 पाऊस - 74 टक्के


हे ही वाचा -


IPL 2025 Rishabh Pant : लिलावाआधी मोठी अपडेट; ऋषभ पंतने RCB टीमशी साधला संपर्क? दिल्लीला टाटा बाय-बाय? पोस्ट व्हायरल


IND vs BAN 2nd Test 2024 : कानपूर कसोटीवर संकटाचे काळे ढग... सामना रद्द झाला तर टीम इंडिला बसणार दणका, WTC पॉइंट टेबलमध्ये येणार खाली?