India vs Bangladesh 2nd Test Day 1 LIVE : टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात आणखी एक रोमांचक सामना रंगणार आहे. उभय संघांमधील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आजपासून खेळवला जाणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांच्या नजरा विजयाकडे असतील. या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशवर 280 धावांनी विजय मिळवला होता. या विजयासह संघाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचे लक्ष्य मालिका जिंकण्यावर असेल.


भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जाणार आहे. सामन्याचा नाणेफेक वेळेवर होऊ शकला नाही. ओल्या आउटफिल्डमुळे टॉसला उशीर झाला. आता 9.30 वाजता मैदानाची पाहणी केली जाणार आहे.


ओल्या मैदानामुळे टॉसला उशीर झाला आहे. कानपूरमध्ये रात्रभर पाऊस सुरू होता. त्यामुळे मैदानाच्या काही भागात अजूनही पाणी साचले आहे. खेळपट्टीसह संपूर्ण मैदान झाकुन ठेवण्यात आले आहे. आता 9.30 वाजता पंच मैदानाची पाहणी करतील आणि त्यानंतरच नाणेफेकीबाबत निर्णय घेतला जाईल. पण हळूहळू संपूर्ण मैदानावरचे कव्हर काढली जात आहेत.


कार्तिक कार्तिकने दिले हवामान अपडेट


माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक दिनेश कार्तिकने हवामानाबाबत एक अपडेट दिले आहे. त्याने लिहिले- इथे रात्री उशिरा पाऊस पडला. मैदानात साचलेले पाणीही हळूहळू काढले जात आहे. सामना वेळेवर सुरू होईल अशी आशा करूया....


भारत-बांगलादेश कसोटी आकडेवारी


भारताने बांगलादेशविरुद्ध कसोटीत 14 सामने खेळले आहेत. कानपूरमध्ये भारत आणि बांगलादेश आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ असेल. कानपूरमध्ये भारताचे रिकॉर्ड्स चांगले आहेत, येथे झालेल्या 23 कसोटी सामन्यांमध्ये त्याने केवळ तीन सामने गमावले आहेत. पण, त्यांना फक्त सात सामने जिंकता आले आहेत, तर 13 पैकी बहुतेक कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत.


भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप. यादव आणि मोहम्मद सिराज.


बांगलादेश संघ : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास, मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, सय्यद खालिद अहमद, झाकीर अली अनिक, तैजुल. इस्लाम, नईम हसन, नाहीद राणा, हसन महमूद.