Shahid Afridi MSL : पाकिस्तान संघाचा माजी खेळाडू आणि कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याने एक मोठी घोषणा केली असून तो स्वत:ची टी10 लीग सुरु करणार आहे. मेगा स्टार लीग (MSL) असं या लीगचं नाव असून यामध्ये क्रिकेटमधून निवृत्त झालेले माजी स्टार क्रिकेटपटू मैदानात उतरणार आहेत. यामध्ये पाकिस्तानी खेळाडूंसह इतरही देशातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटर यामध्ये सामिल होणार असल्याची माहिती समोर येत आहे.


शाहिद आफ्रिदी हा क्रिकेट विश्वातील एक स्टार ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ओळखला जातो. आफ्रिदीने पाकिस्तानसाठी 27 कसोटी, 398 एकदिवसीय आणि 99 T20 सामने खेळले आहेत. त्याला एक दिग्गज टी20 खेळाडू म्हणूनही ओळखलं जातं. दरम्यान 42 वर्षीय आफ्रिदीने यंदा पाकिस्तान सुपर लीग अर्थात पीएसएलमध्ये (PSL) 2022 हा त्याचा शेवटचा सीजन असल्याचं त्याने सांगितलं होतं. त्यामुळे आता त्याने स्वत:चीच क्रिकेट लीग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.


मेगा स्टार लीगमध्ये असणार दिग्गज खेळाडू


मेगा स्टार लीगमध्ये पाकिस्तानचे मुश्ताक अहमद, इंजमाम उल हक आणि वकार यूनिससारखे महान स्टार खेळाडू मैदानात उतरतील. आफ्रिदीने या लीगबाबत सांगताना लवकरत स्पर्धेचं आयोजन सुरु करणार असून यंदा ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये रावळपिंडी याठिकाणी पार पडेल. या स्पर्धेत एकूण सहा संघ असणार असून पाकिस्तानसह इतर देशांचे खेळाडूही या स्पर्धेत भाग घेतील.


हे देखील वाचा-