Shaheen Shah Afridi out of Asia Cup : पाकिस्तानचा आघाडीचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) गुडघ्याच्या दुखापतीमुळे आशिया कपमधून (Asia Cup 2022) बाहेर पडला आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतही तो सहभागी होऊ शकणार नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या मेडीकल टीमने त्याला चार ते सहा आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान या दुखापतीचा उपचार हा दुबईत होणार असून आशिया कपसाठी पाकिस्तानचा संघही दुबईत असल्याने शाहीन संघासोबतच असणार आहे. 


काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) निवेदन जारी करून शाहीन स्पर्धेतून बाहेर पडल्याची माहिती दिली. अफ्रिदीला पुनरागमन करण्यासाठी काही आठवडे लागतील, असेही बोर्डाने म्हटले होते. स्कॅन रिपोर्ट आल्यानंतर पीसीबीने तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला. यानंतर जास्त काळ खेळू शकणार नसल्याचे निश्चित झाले.


भारताच्या टॉप ऑर्डरला दिलासा


शाहीन आफ्रिदी बाहेर पडल्याने भारतीय संघाच्या टॉप ऑर्डरला मोठा दिलासा मिळाला आहे. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शाहीनने जवळपास 70% सामन्यांमध्ये पहिल्याच षटकात विकेट्स घेतल्या आहेत. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकात पहिल्याच षटकात त्याने रोहित शर्माची विकेट घेतली होती. यानंतर त्याने केएल राहुल आणि विराट कोहलीलाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्या सामन्यात टीम इंडियाला 10 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. विश्वचषकात पाकिस्तानकडून भारताचा हा पहिलाच पराभव ठरला.


विश्वचषकापर्यंत तंदुरुस्त होण्याची आशा


ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकापर्यंत शाहीन फिट होईल, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आशिया चषक आणि विश्वचषक दरम्यान पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात सात टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. शाहीन या मालिकेत उपलब्ध होणार नाही.


आशिया कपसाठी पाकिस्तान संघ


बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, शाहनवाज दहनी, उस्मान कादिर. (शाहीनची रिप्लेसमेंट अजून जाहीर झालेली नाही)



हे देखील वाचा-



Asia Cup 2022, Rohit Sharma : आशिया कपमध्ये कसं आहे हिटमॅन रोहित शर्माचं प्रदर्शन? वाचा आकडेवारी 


Deepak Hooda: दिपक हुडा टीम इंडियासाठी ठरतोय लकी! सलग 16 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतानं मिळवलाय विजय