IPL POINTS TABLE

POSTEAMPLDWINLOSTTIEDN/RNET RRPTS 
POSTEAMPWLTN/RNRRPTS 

IPL 2022 गुणतालिका


आयपीएलच्या 15 व्या हंगामात आता 8 ऐवजी 10 संघ आमनेसामने आहेत. प्रत्येक संघाचे 14 सामने होणार आहेत. दहा संघांना अ आणि ब या दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे.

ग्रुप अ - मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल, दिल्ली कॅपिटल, लखनौ सुपर जायंटस्

ग्रुप ब - चेन्नई सुपर किंग्स, सनरायजर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, पुंजाब किंग्स, गुजरात टायटन्स

प्रत्येक संघाचे 14 सामने कसे होणार?

प्रत्येक संघ आपल्या ग्रुपमधील इतर चार संघाविरोधात प्रत्येकी दोन सामने खेळेल. तसेच दुसऱ्या ग्रुपमधील एका संघाबरोबर दोन सामने खेळणार आहे. तर दुसऱ्या ग्रुपमधील इतर संघाबरोबर प्रत्येकी एक एक सामना खेळावा लागेल.

उदा. ग्रुप अ मध्ये मुंबईचा संघ कोलकाता, राजस्थान, दिल्ली आणि लखनौ या संघाबरोबर प्रत्येकी दोन सामने खेळेल. तर ब ग्रुपमधील चेन्नई संघाबरोबर दोन सामने खेळणार आहे.

ब ग्रुपमधील इतर संघाविरोधात मुंबई प्रत्येकी एक सामना खेळणार आहे. याचप्रमाणे ग्रुप बी मध्ये आरसीबीचा संघ चेन्नई, हैदराबाद, पंजाब आणि गुजरात या संघाबरोबर प्रत्येकी दोन सामने खेळेल. तर ग्रुप अ मधील राजस्थान संघाविरोधात दोन सामने खेळेल अन् इतर संघाविरोधात प्रत्येकी एक एक सामना खेळणार आहे.

गुण किती आणि कसे दिले जाणार?प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला दोन गुण मिळतात. सामना रद्द झाल्यास दोन्ही संघाला प्रत्येकी एक एक गुण देण्यात येतो. जर सामना बरोबरीत सुटला तर दोन्ही संघामध्ये सुपर ओव्हर खेळवण्यात येते.

गुणतालिकेत क्रमवारी कशी ठरवली जाईल?दहा संघ प्रत्येकी 14 सामने खेळणार आहे. यामधील अव्वल चार संघ प्लेऑफसाठी पात्र होतील. जर दोन संघाचे गुण समान असताली तर नेट रन रेटच्या आधारावर निर्णय घेतला जाईल.

प्लेऑफ आणि अंतिम सामन्यासाठी संघ कसे पात्र ठरतील?गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. पहिल्या दोन संघामध्ये क्वालिफायर - 1 चा (Qualifier 1) सामना होणार आहे. यातून विजेता संघ अंतिम फेरीत धडक मारणार आहे. तर पराभूत संघांचा सामना क्वालिफायर 2 मध्ये होईल. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघामध्ये एलिमिनेटर 1 (Eliminator 1) मध्ये सामना होणार आहे. यातून विजेता संघ क्वालिफायर 2 मध्ये जाईल. क्वालिफायर - 1 मधील पराभूत संघ आणि एलिमिनेटर 1 मधील विजेत्या संघामध्ये क्वालिफायर 2 मध्ये सामना होणार आहे. यामधील विजेता संघ अंतिम फेरीत धडक मारेल.