Saurabh Tiwary retirement : लांब केस आणि पॉवर हिटिंगमुळे सौरभ तिवारीची तुलना माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याच्यासोबत होत होती. सौरभ तिवारीही (Saurabh Tiwary) धोनीसारखाच झारखंडमधून येतो. सौरभ तिवारी भारतासाठी फक्त तीन वनडे खेळलाय. त्याशिवाय तो मुंबई इंडियन्समध्येही (mumbai indians) खेळला आहे. फक्त तीन आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यानंतर सौरभ तिवारीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मागील काही दिवसांपासून सौरभ तिवारी गुडघ्याच्या दुखापतीचा सामना करत होता.
धोनीसारख्या हेअर स्टाईलमुळे सौरभ तिवारी अल्पवधीतच देशभरात प्रसिद्ध झालाय. इतकेच नाही तर सौरभ तिवारी धोनीसारखा पॉवर हिटिंगसाठी प्रसिद्ध आहे. 34 वर्षीय सौररभ सध्या रणजी चषकात खेळत आहे. त्याचा अखेरचा सामना 16 फेब्रुवारी रोजी असेल. झारखंड आणि आणि राजस्थान यांच्यातील सामन्यानंतर सौरभ तिवारी निवृत्त होतोय. सौरभ तिवारीने वयाच्या 11 व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. वयाच्या 17 व्या वर्षी सौरभ तिवारीने पहिला प्रथम श्रेणीचा सामना खेळला. 2006-07 मध्ये रणजी प्रभावी कामगिरी केली. त्यानंतर 2008 मध्ये मलेशियामध्ये झालेल्या अंडर 19 विश्वचषक विजेत्या संघाचा सौरभ तिवारी महत्वाचा सदस्य होता.
आयपीएलमुळे भारतीय संघात स्थान -
2008 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने अंडर 19 विश्वचषक जिंकला होता. विश्वविजेत्या संघाचा सौरभ तिवारी सदस्य होता. मुंबई इंडियन्सने सौरभ तिवारीला खरेदी केले. 2010 आयपीएल मध्ये सौरभ तिवारीने 419 धावांचा पाऊस पाडला. या शानदार कामगिरीनंतर त्याला आशिया चषकासाठी भारतीय संघात स्थान मिळाले. पण त्याला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळाले नाही. पण ऑक्टोबर 2010 मध्ये त्याला पदार्पणाची संधी मिळाली. विशाखापट्टनम येथे ऑस्ट्रेलियाविरोधात वनडे सामन्यात सौरभ तिवारीमध्ये पदार्पण केले. या सामन्यात सौरभ तिवारीला 17 चेंडूत 12 धावा करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. सौरभ तिवारीला तीन सामन्यात दोन वेळा फलंदाजी करण्याची संधी मिळाली, त्यामध्ये एकवेळा नाबाद झाला. त्यानंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही.
धोनीसारखी हेअरस्टाईल -
सौरभ तिवारी याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी केली. 17 वर्षात 115 प्रथम श्रेणी सामने खेळले. झारखंडकडून सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज झाला. सौरभ तिवारीच्या नावावर 189 डावात 48 च्या सरासरीने 8030 धावा आहेत. त्यामध्ये 22 शतके आणि 34 अर्धशतकांचा समावेश आहे. धोनीने झारखंडकडून खेळताना 131 सामन्यात 7038 धावा केल्या आहेत. सौरभ तिवारी हा धोनीसारख्या लांब केसामुळे अल्पवधीतच देशात प्रसिद्ध झाला होता. त्याला झारखंडचा छोटा धोनी म्हणून ओळखलं जायचं.
दुखापतीमुळे करिअर उतरणीला लागलं
मुंबई इंडियन्सनंतर 2011 मध्ये आरसीबीने सौरभ तिवारीला खरेदी केले. पण त्याला फॉर्म कायम ठेवता आला नाही. त्यानंतर 2014 मध्ये दिल्लीने त्याच्यावर डाव खेळला. पण त्यानंतर तो दुखापतग्रस्त झाला. 2021 मध्ये पुन्हा मुंबईने सौरभ तिवारीवर डाव खेळला. सौरभ तिवारी मुंबईच्या संघात रोहितच्या नेतृत्वात मैदानात होता. त्याआधी दिल्ली आणि पुणे संघाकडूनही तो खेळलाय. दुखापतीमुळे सौरभ तिवारीच्या करिअरला उतरती कळा लागली. सौरभ तिवारीने आयपीएलमध्ये 29 च्या सरासरीने आणि 120 च्या स्ट्राईकरेटने 1494 धावा केल्या.
आणखी वाचा :
KL राहुल तिसऱ्या कसोटीतून बाहेर, कोहलीच्या फेव्हरेट खेळाडूला संधी मिळण्याची चिन्हं