KL Rahul : भारत आणि इंग्लंड यांच्यात 15 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारताचा विकेटकीपर फलंदाज के एल राहुल बाहेर पडला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना राजकोट इथं खेळवला जाणार आहे. दोनच दिवसांपूर्वी भारताचा संघ जाहीर झाला होता. आगामी तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात रवींद्र जाडेजा आणि के एल राहुल यांचा समावेश करण्यात आला होता. मात्र या दोघांचं खेळणं हे फिटनेस टेस्टवर अवलंबून होतं. आता के एल राहुल खेळणार नाही हे स्पष्ट झालं आहे. के एल राहुलऐवजी आता कर्नाटकच्या देवदत्त पड्डीकलला (Devdutt Padikkal ) टीम इंडियात स्थान मिळण्याची शक्यता आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी 1-1 असा विजय मिळवला आहे. 


दरम्यान, इंग्लंड (England) कसोटी मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांसाठी बीसीसीआयनं (BCCI) टीम इंडियाचा संघ जाहीर केला आहे. आगामी तीन सामन्यांसाठीही विराट कोहली (Virat Kohli) संघात नाही. वैयक्तिक कारणांमुळे तो हे तीन सामने खेळणार नाही, अशी माहिती बीसीसीआयच्या वतीनं देण्यात आली आहे. श्रेयसला दुखापतीमुळे संघात स्थान मिळालेलं नाही.  






जाडेजा आणि राहुलला दुखापतीमुळे विशाखापट्टणम येथील दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकावं लागलं होतं.. दोघांच्या पुढच्या तीन सामन्यांत खेळण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. आता राहुल या कसोटीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असेल, याबाबत उत्सुकता आहे.


इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित 3 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाचा स्क्वॉड 


रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल*, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जाडेजा*, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप. 


इंग्लंडलाही धक्का 


दरम्यान, तिकडे इंग्लंडलाही दुखापतीचं ग्रहण लागलं आहे.  इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा फिरकी गोलंदाज जॅक लीच जखमी झाल्याने मायदेशी परतला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान लीचला दुखापत झाली होती. हा सामना हैदराबादमध्ये खेळला गेला.  


टीम इंडिया Vs इंग्लंड टेस्ट सीरीजचं शेड्यूल 


1st टेस्ट : 25-29 जानेवारी, हैदराबाद (इंग्लंड 28 धावांनी विजय) 
2nd टेस्ट : 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टनम (टीम इंडियाचा 106 धावांनी विजय) 
3rd टेस्ट : 15-19 फेब्रुवारी, राजकोट 
4th टेस्ट : 23-27 फेब्रुवारी, रांची 
5th टेस्ट : 7-11 मार्च, धर्मशाला


संबंधित बातम्या 


IND vs ENG 3rd Test : इंग्लंडला राजकोट कसोटीपूर्वी मोठा धक्का; सर्वोत्तम कामगिरी करणारा हुकमी खेळाडू थेट घरी परतला