Sarfaraz Khan Century Video Celebration Ind vs Nz 1st Test : बंगळुरू कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी खेळ सुरू होताच भारतीय संघाचा युवा खेळाडू सरफराज खानच्या बॅटमधून उत्कृष्ट शतकी खेळी पाहायला मिळाली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सरफराज 70 धावांवर नाबाद होता, तर चौथ्या दिवसाचा खेळ सुरू असताना ऋषभ पंत त्याच्यासोबत फलंदाजीला आला. सरफराजने सकारात्मक पद्धतीने फलंदाजी सुरू ठेवली आणि वेगवान गतीने धावा काढण्यास सुरुवात केली, त्याने 110 चेंडूत पहिले कसोटी शतक पूर्ण केले. शतकीय खेळी खेळल्यानंतर सरफराजचा आनंद गगनात मावेना, सेलिब्रेशनचा भन्नाट व्हिडीओ एकदा पाहाच.






सरफराज खानच्या कसोटी कारकिर्दीतील हा केवळ चौथा सामना आहे. या शतकापूर्वी त्याने या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान तीन अर्धशतकांच्या खेळीही खेळल्या होत्या. सरफराज खानच्या या शतकीय खेळीमुळे दुसऱ्या डावात भारतीय संघाने शानदार पुनरागमन केले. सरफराजने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक न्यूझीलंडविरुद्ध झळकावले आहे.






बंगळुरू कसोटी सामन्यात शुभमन गिलच्या जागी सरफराज खानला प्लेइंग 11 मध्ये जागा मिळाली होती. गिलच्या बाहेर पडल्यानंतर कोहली क्रमांक-3 वर फलंदाजी करत असताना, सरफराजला क्रमांक-4 वर फलंदाजीची संधी मिळाली. यापूर्वी बांगलादेशविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान सरफराजला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्याने प्लेइंग 11 मध्ये पुनरागमन केल्याने त्याच्या शतकामुळे संघातील त्याचे स्थान निश्चित झाले आहे. पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात शतक झळकावणाऱ्या भारतीय संघाच्या कसोटीतील अशा खेळाडूंच्या यादीत आता सरफराज खानचा समावेश झाला आहे.


सरफराज खान गेल्या अनेक वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करत होता. पण त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळत नव्हते. या वर्षी भारताच्या इंग्लंड दौऱ्यात त्याला टीम इंडियासाठी कसोटी क्रिकेटची पहिली इनिंग खेळण्याची संधी मिळाली. सरफराजने याचा पुरेपूर फायदा घेतला आणि पहिल्याच डावात अर्धशतक झळकावले. न्यूझीलंडविरुद्धची ही कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी सरफराज खान इराणी ट्रॉफी सामना खेळण्यासाठी गेला होता ज्यामध्ये त्याने आपल्या बॅटने द्विशतक झळकावले होते.


हे ही वाचा -


Sarfaraz Khan Century : कर हर मैदान फतेह....! सरफराज खानने ठोकले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक, न्यूझीलंडची उडवली झोप