Sarfaraz Khan Century : बंगळुरू कसोटीच्या पहिल्या डावात 46 धावांवर ऑलआऊट झाल्यानंतर टीम इंडियाकडून क्वचितच कोणी पुनरागमनाची अपेक्षा केली असेल. पण, आता सरफराज खानच्या शतकाने आशेची ज्योत पुन्हा पेटवली आहे. सरफराजने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावून न्यूझीलंडची झोप उडवली आहे. न्यूझीलंडने पहिल्या डावात भारताविरुद्ध 356 धावांची आघाडी घेतली होती. सरफराजच्या शतकामुळे टीम इंडिया आता किवीजच्या त्या मोठ्या आघाडीतून सावरताना दिसत आहे.


सरफराज खानने ठोकले पहिले कसोटी शतक  


सरफराज खानने बेंगळुरू कसोटीत 109 चेंडूत शतक पूर्ण केले. त्याने 13 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने हे शतक झळकावले. सरफराज खानच्या कसोटी कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे, ज्याची स्क्रिप्ट त्याने चौथ्या कसोटी सामन्यात लिहिली आहे. याआधी त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 3 अर्धशतके आहेत.






सरफराज खान पहिल्या डावात शून्यावर बाद झाला. पण, त्याने दुसऱ्या डावात तुफानी शतक ठोकले. आता टीम इंडियाच्या आशा सरफराजवर टेकल्या आहेत. सरफराजला हेही माहीत असावे की अजून काम पूर्ण झालेले नाही. टीम इंडियाला विजयाकडे नोयचे असेल, तर त्याला पहिले कसोटी शतक आणखी मोठे करावे लागेल. 


सरफराज हे करू शकतो यात शंका नाही. तो बंगळुरूमध्ये मोठी खेळी खेळू शकतो. आम्ही असे म्हणत आहोत कारण त्याला मोठे डाव कसे खेळायचे हे माहित आहे. अलीकडेच त्याने इराणी चषकात द्विशतक झळकावले. आता त्याच्याकडून बंगळुरूमध्येही असेच काहीसे अपेक्षित आहे.






सरफराजने विराट कोहलीसोबत केली 136 धावांची भागीदारी


बंगळुरू कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्राच्या पहिल्या तासात सरफराजने आपले शतक पूर्ण केले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा तो 70 धावा करून नाबाद राहिला. आपल्या शतकी खेळीदरम्यान त्याने विराट कोहलीसोबत तिसऱ्या विकेटसाठी 163 चेंडूत 136 धावांची मोठी भागीदारीही केली होती.


हे ही वाचा -


Video : चेंडू डोक्यावर लागला अन् खेळाडू थेट जमिनीवर कोसळला, टी-20 वर्ल्ड कपमध्ये मोठा अपघात; सामना थांबवण्याची वेळ!


Ind vs Pak : क्रिकेटच्या मैदानात आज रात्री रंगणार हायव्होल्टेज भारत-पाकिस्तान सामना, जाणून घ्या कुठे पाहू शकता LIVE