Sanjay Manjrekar on Gautam Gambhir Press Conference : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सोमवारी 11 नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली. ज्यात त्यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. पण कदाचित टीम इंडियाचा माजी क्रिकेटर संजय मांजरेकरला गौतम गंभीरची ही पत्रकार परिषद आवडली नाही. गंभीरला नीट बोलण्याची पद्धत बरोबर नाही आणि पुढच्या वेळी रोहित किंवा आगरकर यांना पत्रकार परिषदेला पाठवा, असे मांजरेकर यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
संजय मांजरेकर यांनी गंभीरची खिल्ली उडवली
न्यूझीलंड कसोटी मालिकेतील लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांना एकापाठोपाठ एक अनेक प्रश्न विचारण्यात आले. गंभीरने सर्व प्रश्नांची हुशारीने उत्तरे दिली. मात्र त्यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर लगेचच माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी एक ट्विट केले ज्याने सगळेच थक्क झाले.
मांजरेकर यांनी ट्विट करून लिहिले, 'गौतम गंभीरची पत्रकार परिषद पाहिली. त्याला पडद्यामागे काम करू द्या, अशा कामापासून दूर ठेवले पाहिजे, बीसीसीआयसाठी शहाणपणाचे ठरेल. त्याच्याकडे (गंभीर) ना कोणाशी बोलण्यासाठी ना योग्य शब्द आहेत ना बोलण्याची योग्य पद्धत. रोहित आणि आगरकर यांनी माध्यमांशी सामोरे जाणे चांगले.
गंभीरला टीकेला जावे लागले सामोरे
संजय मांजरेकर अनेकदा सोशल मीडियावर अशी वादग्रस्त विधाने करतात. मात्र यावेळी गंभीरला थेट टोमणा मारत मांजरेकरांनी थेट मोठ्या वादाला आमंत्रण दिले आहे. जेव्हा टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 3-0 असा पराभव पत्करावा लागला तेव्हा संघाला तसेच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते.
आता टीम इंडियासमोर 22 नोव्हेंबरपासून बॉर्डर गावसकर ट्रॉफीचे आव्हान आहे. जर निकाल टीम इंडियाच्या बाजूने लागला नाही, तर गौतम गंभीरकडून मुख्य प्रशिक्षकाची कमान काढून घेतली जाणार नसल्याच्या बातम्या येत आहेत, मात्र लाल चेंडू आणि पांढऱ्या चेंडूसाठी वेगवेगळे प्रशिक्षक निश्चितपणे नियुक्त केले जाऊ शकतात. बॉर्डर गावसकर ट्रॉफी टीम इंडियासाठी दुसऱ्या अर्थाने महत्त्वाची आहे, कारण जर भारत ऑस्ट्रेलियाला 4-0 ने पराभूत करण्यात अपयशी ठरला. तर टीम इंडियाला WTC फायनलमध्ये खेळणे कठीण होऊ शकते.
हे ही वाचा -
Virat Kohli : न्यूझीलंडविरुद्धचा पराभव विराट कोहलीच्या लागला जिव्हारी! ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी घेतला मोठा निर्णय अन्...