Jasprit Bumrah lead India Rohit Sharma Absence : 22 नोव्हेंबरपासून भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळली जाणार आहे. आणि त्यामध्ये पाहिल्यांदाच पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा आधीच झाली आहे. टीम इंडियाची एक तुकडीही ऑस्ट्रेलियाला रवाना झाली असून त्यात शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल आणि मोहम्मद सिराज या खेळाडूंचा समावेश आहे. मुख्य प्रशिक्षक आणि इतर वरिष्ठ खेळाडू दुसऱ्या बॅचमध्ये जातील. दरम्यान, या मालिकेचा एक प्रोमो ब्रॉडकास्टरने रिलीज केला होता आणि आता त्याबद्दल बराच गदारोळ झाला आहे.


खरंतर हा प्रोमोचा ग्राफिक ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान दाखवण्यात आला. या ग्राफिक्समध्ये भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीसह ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सचा फोटो होता, पण संघाचा कर्णधार रोहित शर्मा आहे. खऱ्या अर्थाने पाहिल्यास, ग्राफिक्समध्ये रोहित शर्माचा पॅट कमिन्ससोबतचा फोटो असायला हवा होता. त्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. पण पहिल्या कसोटी सामन्यात नियमित कर्णधार रोहित शर्माच्या खेळण्यावर मोठी शंका आहे. त्यामुळे रोहित पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकला नाही तर त्याच्या जागी कर्णधार विराट कोहली असणार का? हा मोठा प्रश्न चाहत्यांना पडला. आता भारताचे माजी क्रिकेटपटू आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी याबाबत वक्तव्य केले आहे.




ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणाले की, जर रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकला नाही तर जसप्रीत बुमराह संघाची धुरा सांभाळेल. तो संघाचा उपकर्णधारही आहे. बुमराहने यापूर्वी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवले होते, ज्यामध्ये भारतीय संघाचा पराभव झाला होता. सलामीच्या फलंदाजाच्या स्थानासाठी केएल राहुल आणि अभिमन्यू ईश्वरन यांच्या रूपात संघाकडे पर्याय असल्याचेही त्याने सांगितले.




भारतीय संघाने गेल्या चार वेळा ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकली आहे. पण यावेळी टीम इंडियासाठी हा मार्ग सोपा दिसत नाहीये. भारतीय संघाला घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका 3-0 अशी गमवावी लागली होती. तर ऑस्ट्रेलियन खेळाडू या मालिकेसाठी आधीच तयारी करत आहेत. पाकिस्तानविरुद्धचा शेवटचा वनडे सामना ऑस्ट्रेलियाच्या बहुतांश वरिष्ठ खेळाडूंनी खेळला नव्हता.


बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, आर जडेजा, आर. मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.


हे ही वाचा -


IND vs AUS 1st Test : 'रोहित बाहेर गेला तरी आमच्याकडे पर्याय आहेत...' कोण करणार ओपनिंग? कोच गंभीरने सांगितली दोन नावं