Australia vs India 3rd Test : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय फलंदाजांची कामगिरी काही खास राहिलेली नाही. पर्थ कसोटीतील दुसरा डाव सोडला तर भारतीय फलंदाजांना ऑस्ट्रेलियात विशेष काही करता आले नाही. ॲडलेड सामन्याच्या दोन्ही डावात भारताची कामगिरी खराब राहिली आणि त्यामुळे पराभवाला सामोरे जावे लागले. आता ब्रिस्बेन कसोटीच्या पहिल्या डावात भारताने तिसऱ्या दिवशी चहापानापर्यंत 48 धावांत 4 विकेट गमावल्या आहेत. यानंतर माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी बीसीसीआय आणि कोच गौतम गंभीरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
यशस्वी, गिल, विराट आणि पंत ठरले फेल
नाव न घेता मांजरेकर यांनी बीसीसीआय तसेच भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि त्यांच्या कोच टीमला अनेक प्रश्न विचारले आहेत. गंभीरच्या कोच टीममध्ये सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन देशकाटे, सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर आणि गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांचा समावेश आहे. त्याने भारतीय संघातील फलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. ऋषभ पंत 9, यशस्वी जैस्वाल 4, विराट कोहली 3 आणि शुभम गिल 1 धावा करून स्वस्तात बाद झाले.
फलंदाजी प्रशिक्षकावर प्रश्न
मांजरेकर यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या टीममधील फलंदाजी प्रशिक्षकाला धारेवर धरले. भारताचे फलंदाजी प्रशिक्षक अभिषेक नायर आणि रायन टेन डोईशेट आहे. माजी फलंदाजाने म्हटले की, मला वाटते की आता भारतीय संघातील फलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकाबाबत पुन्हा विचार करण्याची वेळ आली आहे. काही भारतीय फलंदाजांबाबत मोठ्या तांत्रिक समस्या दीर्घकाळापासून सोडवलेल्या गेलेल्या नाहीत.'
चार डावात टीम इंडियाने फक्त एकदाच 200 धावांचा टप्पा केला पार....
सध्याच्या दौऱ्यात भारतीय फलंदाजीची स्थिती बिकट दिसत आहे. पर्थमधील दुसरा डाव वगळता टीम इंडियाला 200 धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही. भारताने आतापर्यंत चार डावात 150, 487/6, 180 आणि 175 धावा केल्या आहेत. यातून त्यांच्या तांत्रिक त्रुटी समोर आल्या आहेत. विराट, यशस्वी, गिल आणि पंत बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर टीम इंडियावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
हे ही वाचा -