Australia vs India 3rd Test : गावसकर-बॉर्डर ट्रॉफी खेळण्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. तिसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस नक्कीच यजमानांच्या नावावर होता, पण या डावातही भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने छाप सोडली आहे. यादरम्यान 2008 मध्ये ऑस्ट्रेलियन भूमीवर झालेल्या 'मंकीगेट' या वांशिक टिप्पणीची पुनरावृत्ती झाली. या सामन्यादरम्यान महिला समालोचक इसा गुहाने जसप्रीत बुमराहवर वांशिक टिप्पणी केली, त्यानंतर नवा वाद निर्माण झाला.
पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराह चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, त्याने यजमान संघाच्या सलामीवीरांना झटपट पॅव्हेलियनमध्ये पाठवले, परंतु ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथने पाहुण्यांना लवकर आघाडी मिळवून दिली. पण कॉमेंट्री करताना ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने त्याचे खूप कौतुक केले. फॉक्स क्रिकेटसाठी कॉमेंट्री करताना तो म्हणाला, 'आज बुमराहने 5 ओव्हरमध्ये 4 रन्स देऊन 2 विकेट घेतल्या. ब्रेट लीसोबत कॉमेंट्री करत असलेली इंग्लंडची माजी क्रिकेटर इसा गुहा हिने वादग्रस्त कमेंट केली. ब्रेट लीला प्रत्युत्तर देताना इसा म्हणाली की, 'तो एमव्हीपी आहे, म्हणजे प्राइमेट बरोबर ना...
'प्राइमेट' म्हणजे काय?
क्रिकेटच्या मैदानात किंवा कोणत्याही खेळाच्या मैदानात एमव्हीपीचा अर्थ 'मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर' असा होतो, पण इसा गुहा हिने त्याचा अर्थ सांगताना बुमराहसाठी 'मोस्ट व्हॅल्युएबल प्राइमेट' हा शब्द वापरला. ज्याचा अर्थ ' मोठ्या बुद्धीचा माकड' असा होतो. आता या कमेंटनंतर महिला कॉमेंटेटर मोठ्या वादात अडकली आहे. मात्र, भारतीय क्रिकेटपटूवर वांशिक टिप्पणी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी 2008 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियासोबतही ही घटना घडली होती.
2008 मध्ये भज्जी आणि सायमंड्समध्ये झाला होता वाद
2008 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघासोबत हा वाद यापूर्वीही झाला होता. 2008 साली घडलेला 'मंकीगेट कांड' अजूनही क्रिकेट चाहत्यांच्या मनात आहे. खरंतर, हरभजन सिंगचा दिवंगत ऑस्ट्रेलियन क्रिकेटर अँड्र्यू सायमंड्ससोबत वाद झाला होता. या वादानंतर सायमंड्सने भज्जीवर सायमंड्सला माकड म्हटल्याचा आरोप केला. सायमंडने भज्जीवर जातीय टिप्पणी केल्याचा आरोप केला होता, त्यानंतर हरभजन सिंगवरही काही सामन्यांची बंदी घालण्यात आली होती. पणनंतर सचिनच्या साक्षीनंतर भज्जीवरील बंदी उठवण्यात आली.
हे ही वाचा -